लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अडीच हजार वर्षापूर्वी मानवाच्या कल्याणासाठी तथागत बुद्धांनी दिलेले विचारच माणसाला समृद्ध व प्रगतशील करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी बुध्दाचे विचार जीवनात अंगीकारावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांनी केले.त्रिरत्न समता संघाच्या मार्गदर्शनात सम्यक बौध्द समाज महिला बचत गटाच्या वतीने विठ्ठलगाव येथे बुध्द पौर्णिमा उत्सवात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी नागपूर येथील भदंत धम्मसेवक महाथेरो यांनी उपस्थितांना धम्मदेशना केली. याप्रसंगी अमरावतीचे अनिल ढवले महाराज, आमदार कृष्णा गजबे, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, पं.स.चे माजी सभापती प्रिती शंभरकर, समता सैनिक दलाचे जी. वासुदेवन, वसंत माठे, डॉ. उद्धव बौध्द, डॉ. वंदना धोंगडे, डॉ. यादव रामटेके, चंदूराव राऊत, नरेश मेश्राम, ए. एम. रामटेके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मारोती रामटेके, संचालन गौतम लांडगे यांनी केले तर आभार गिरीधर मेश्राम यांनी मानले.
बुद्धांचे विचार अंगीकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 12:46 AM
अडीच हजार वर्षापूर्वी मानवाच्या कल्याणासाठी तथागत बुद्धांनी दिलेले विचारच माणसाला समृद्ध व प्रगतशील करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी बुध्दाचे विचार जीवनात अंगीकारावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांनी केले.
ठळक मुद्देमेश्राम यांचे प्रतिपादन : विठ्ठलगावात बचत गटातर्फे कार्यक्रम