लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक नगर परिषद प्रशासनाने आठ दिवसांनंतर पुन्हा मंगळवारपासून शहरात अतिक्रमण हटाव माेहीम सुरू केली आहे. ज्या दुकानदारांचे लाेखंडी ठेले अतिक्रमित जागेवर हाेते, ते क्रेनच्या साहाय्याने उचलले जात हाेते. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. गडचिराेली शहरातील मूल व धानाेरा मार्गावर रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून माेठमाेठ्या लाेखंडी ठेल्यांमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. ठेला अतिक्रमित जागेवर असताना त्याच्यासमाेर पुन्हा शेड उभारून व्यवसाय थाटला हाेता. नालीच्या बांधकामादरम्यान अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले. विशेष करून इंदिरा गांधी चाैकात तर अगदी रस्त्यापर्यंत दुकाने पाेहाेचली हाेती. नगर परिषदेचे प्रशासक तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर व मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. दुकानदारांनी स्वत: ठेले न हटविल्यास नगर परिषद प्रशासन ठेले उचलेल अशी तंबी दिल्यानंतर दुकानदारांनी स्वत:च ठेले उचलण्यास सुरुवात केली.
इंदिरा गांधी चाैकाने घेतला माेकळा श्वास इंदिरा गांधी चाैक हा शहरातील मुख्य चाैक आहे. मात्र, चारही बाजूने असलेल्या अतिक्रमित ठेल्यांमुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी राहत हाेती. पानठेले, दुकानांवर येणारे ग्राहक अगदी रस्त्यावरच वाहने उभी ठेवत हाेती. अतिक्रमण हटल्यामुळे चारही बाजूने ऐसपैस जागा दिसून येत आहे.
नागरिकांना झाली रूचेश जयवंशी यांची आठवणसात ते आठ वर्षांपूर्वी आयएएस असलेले रूचेश जयवंशी हे मुख्याधिकारी बनले हाेते. त्यांनी अतिक्रमण काढले हाेते. त्याही वेळी अतिक्रमण काढण्याला बराच विराेध झाला हाेता. मात्र, कुणाचीही न मानता त्यांनी अतिक्रमण काढले हाेते. सध्याच्या अतिक्रमण हटाव माेहिमेमुळे नागरिकांना त्यांची आठवण झाली.
पुन्हा अतिक्रमण हाेणार नाही याची व्यवस्था करावीअतिक्रमण हटविल्यानंतर काही दिवसांनंतर त्याच ठिकाणी अतिक्रमण झाल्याच्या घटना आजपर्यंत घडत आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण हाेणार नाही, अशी कायमस्वरूपी व्यवस्था हाेण्याची गरज आहे.
हातगाडी ठेवू द्यावीरस्त्याच्या बाजुला असलेल्या नालीवर अस्थायी हातगाडी ठेवून व्यवसाय करू द्यावा. रात्री साेबत हातगाडी घरी नेली जाईल, अशी अपेक्षा दुकानदारांनी केली.