लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारकांनी आपले बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. शासकीय जमीन गिळंकृत केली जात असली तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.तालुका मुख्यालयाच्या बसस्थानकापासून तर संपूर्ण नगर पंचायतीचे क्षेत्र अवैध अतिक्रमण व बांधकामाने घेरले आहे. यातून स्मशानूभूमी, कब्रस्तान परिसरही सुटला नाही. अवैध अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सुस्त बसून आहेत. स्वातंत्र्यपूर्व कालीन मोगलाई अवतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागसुद्धा तोंडात मिठाची गुळणी घेऊन स्वस्त बसला आहे. जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या ६ आॅक्टोबर २००७ च्या आदेशाची अहवेलना झाली आहे. विभागीय आयुक्त यांच्याकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र स्थानिक प्रशासनाचे अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.जिल्हाधिकाºयांनी ६ आॅक्टोबर २००७ रोजी काढलेल्या पत्रात अतिक्रमण हटविण्याबाबतचा आदेश पारित केला होता. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासकीय यंत्रणांना उद्देशून जिल्हाधिकाºयांनी अतिक्रमण हटविण्याचे अधिकार पंचायत अधिनियम १९५८ नियम ५३ नुसार सरपंच यांना आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे अधिकार संबंधित यंत्रणेला असून त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तहसीलदार सिरोंचा यांनी अमलात आणावी, त्यानुसार तत्काळ कार्यवाही अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले होते. तत्कालीन प्रभारी तहसीलदार दयाराम भोयर यांनी वरिष्ठांच्या आदेशाची दखल घेऊन कारवाई केली. त्यानंतर १६ जुलै २०१२ रोजी सिरोंचाचे अधिनस्त मंडळ अधिकारी व तलाठी यांना अतिक्रमण हटवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यांनी कारवाई केली नाही.अतिक्रमित जागेत पक्के बांधकामसुरुवातीला अतिक्रमण करताना ते हटविले जाण्याची शक्यता राहत असल्याने काही दिवस अतिक्रमणधारक साध्या झोपड्या उभारून सभोवताल काट्यांचे कुंपन करतात. एखादी वर्ष प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पक्के बांधकाम केले जाते. याच माध्यमातून सिरोंचा शहरात अतिक्रमण वाढत चालले आहे. पक्के बांधकाम झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सहजासहजी अतिक्रमण काढत नसल्याचा पक्का विश्वास येथील अतिक्रमणधारकांना अनुभवातून आला आहे. काही दिवसानंतर नगर पंचायत अतिक्रमणधारकांनाच वीज, पाणी यासारख्या सोयीसुविधा पुरविते. त्यामुळे अतिक्रमण कायम होत चालले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे फुकटची जागा मिळत असल्याने बºयाच मोठ्या जागेवर कुंपन केले जात आहे.
सिरोंचा शहराला अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 1:08 AM
सिरोंचा शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारकांनी आपले बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. शासकीय जमीन गिळंकृत केली जात असली तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : शहराच्या सभोवतालची जमीन गिळंकृत