देसाईगंज शहराचा विस्तार अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यापारनगरी असल्याने आणि आतापर्यंत लॉकडाऊनची स्थिती असल्याने बाजारात पाहिजे तेवढ्या प्रमाणात वर्दळ नव्हती. जसजशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली तसतशी बाजारपेठेतील वर्दळ वाढली. यातच ठिकठिकाणी लोकांनी अतिक्रमण करून रस्त्यालगत दुकाने थाटण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.
अतिक्रमणधारकांना कोणतीच यंत्रणा टोकत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई करत नाही. यातून वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहे. हा प्रकार वाढण्यासाठी यंत्रणाच जबाबदार असल्याचे नागारिकांचे म्हणणे आहे. रेल्वेचा भुयारी पूल सुरू झाल्यापासून कुरखेडा टी-पाईंटवरून जो फाटकाचा मार्ग होता, तो बंद झाला. त्याच्या विरुद्ध बाजूला मोठे कापड दुकाने असल्याने त्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. भुयारी पुलाच्या तोंडाशी अगदी वळण घेण्याच्या ठिकाणावरच दुकाने थाटल्यामुळे एस.टी. बसेस, मालवाहू ट्रक, चारचाकी गाड्या वळविण्यास अडचणी येत आहेत. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास ही समस्या वाढून चारचाकी व दुचाकीस्वारांना वाहतुकीच्या अडचणी निर्माण होणार आहेत.
250921\img_20210922_134548.jpg
हाच तो कुरखेडा टी.पाॕईंट व सुसाट वेगाने होत असलेले अतिक्रमण .