शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सिंचनाचा दुष्काळ संपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 11:59 PM

गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. सुमारे २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. मात्र जेमतेम २६ हजार हेक्टरवरच सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देजनतेच्या जिव्हाळ््याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. सुमारे २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. मात्र जेमतेम २६ हजार हेक्टरवरच सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. एकूण शेत जमिनीच्या केवळ १० टक्के क्षेत्रावर सिंचन आहे. सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी आमच्याकडून अनेक वर्षांपासून मागणी होत असली तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात आहे. आता ३-४ वर्षात सिंचन विहीरी दिल्याने थोडा दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली.उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यामुळे संपूर्ण अर्थकारण शेतीवरच आधारित आहे. येथील वातावरण व जमीन धान पिकासाठी अनुकूल असल्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे धान पिकाला अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत पाणी द्यावे लागते. त्यामुळे हातची सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी पावसाच्या भरवशावरच शेती केली जाते.पावसाने दगा दिल्यास पीक करपताना बघावे लागते. बºयाचवेळा उत्पादन खर्चही निघत नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन निवडून येणाºया प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून दिले जाते. मात्र ज्या प्रमाणात सिंचनाचे क्षेत्र वाढायला पाहिजे ते वाढत नाही. आधुनिक तंत्रज्ञान व सुशिक्षित झालेला शेतकरी आपल्या शेतात अनेक प्रयोग करून शेती करू इच्छितो. पण सिंचनच उपलब्ध नसेल तर शेती करणार तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. गावात रस्ते, नाली बांधण्याऐवजी तोच निधी प्राधान्याने सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथील शेतकºयांची स्थिती सुधारण्यास मदत होईल.जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यावर बंधाऱ्यांचे बांधकाम होणे आवश्यक आहे. मात्र बंधारे बांधल्या गेले नाही. काही बंधाऱ्यांचे बांधकाम अपुरे आहे. तर काही बंधारे निकृष्ट दर्जाचे बांधल्याने ते पहिल्याच पाण्यात वाहून गेले आहेत. शेततळे हे केवळ शासनाचे सोंग आहे. उन्हाळयात शेततळ्यांमध्ये पाणी राहत नाही. कर्जमाफी हा तोडगा नाही तर सिंचन सुविधा हाच खरा उपाय आहे.- जगन्नाथ बोरकुटे, जि. प. सदस्य.आपले पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यामुळे कृषीमध्ये येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे सुमारे १५ एकर शेती आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे शक्य सुद्धा आहे. मात्र सिंचनाची सुविधा नाही. परिणामी सर्वच मार्ग बंद झाले आहेत. चिचडोह बॅरेजप्रमाणे इतरही नद्यांवर बंधारे झाल्यास बारमाही सिंचनाची सुविधा होईल. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- दीपक धोटे, देसाईगंज

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प