गडचिराेली : दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक झाल्याने एकजण जागीच ठार तर दाेघे किरकाेळ जखमी झाल्याची घटना देसाईगंज तालुक्याच्या काेरेगाव येथे बुधवार १५ नाेव्हेंबर राेजी सायंकाळच्या सुमारास घडली.
प्रभाकर तुळशीराम मेश्राम (३५) रा. बाेळधा हे जागीच ठार झाले तर धनराज हरी गायकवाड (४०) व पीतांबर रतिराम गायकवाड (३२) दाेघेही राहणार बाेळधा हे दाेघे किरकोळ जखमी झाले. त्यांना देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. विशेष म्हणजे, दाेन्ही दोन्ही मोटरसायकलस्वार एकाच गावातील असून प्रभाकर तुळशीराम मेश्राम हा कोरेगाववरून बाेळधाकडे तर धनराज गायकवाड व पीतांबर गायकवाड हे दाेघेही बाेळधावरून कोरेगावकडे दुचाकीने जात हाेते.
दरम्यान काेरेगावजवळच्या हनुमान व्यायाम शाळेजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दाेन्ही दुचाकींची समाेरासमाेर धडक झाली. यात प्रभाकर मेश्राम हे जागीच ठार झाले. पीतांबर गायकवाड यांच्या पायाला जबर मार लागला, तर धनराज गायकवाड हा किरकोळ जखमी झाला. दाेन्ही जखमींना देसाईगंज ग्रामीण रुग्णलयात उपचारार्थ भरती करण्यात आले. प्रभाकर यांचा मृतदेह उत्तररीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला हाेता. या घटनेचा अधिक तपास पीएसआय धनगर हे करीत आहेत.