देसाईगंज पोलिसांची कारवाई : आरोपी मूल तालुक्यातील सुशीचा रहिवासी देसाईगंज : मूल येथे वनविभागात आपण अधिकारी आहोत, अशी बतावणी करून अर्जुनीवरून देसाईगंजमार्ग दुचाकीवरून दारूची वाहतूक करताना देसाईगंज पोलिसांनी बुधवारी अजय रमेश टेकाम (३५) रा. सुशी ता. मूल जि. चंद्रपूर याला अटक केली. त्याच्या विरूद्ध मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.देसाईगंज पोलिसांनी अर्जुनी ते देसाईगंज या मुख्य मार्गावर सापळा रचला होता. यावेळी दुचाकी वाहन क्रमांक एमएच-३४-क्यू-५३३६ वरून अजय रमेश टेकाम हे येत असल्याचे पोलिसांना दिसून आले. सदर मोटार सायकल चालकास पोलिसांनी थांबवून त्याची विचारपूस केली. यावेळी सदर इसमाच्या बॅगमध्ये देशी दारूच्या ४ हजार रूपये किंमतीच्या १०० निपा व ३० हजार रूपये किंमतीची मोटार सायकल असा ३४ हजारांचा मुद्देमाल दिसून आला. यावेळी सदर इसमाने आपण मूल येथे वन विभागात वनरक्षक पदावर असल्याचे पोलिसांना सांगितले व गोंदिया जिल्ह्यातील कोरंबी येथे नातेवाईकाकडे गेलो होतो. गावातील दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी दारू नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मूल वन विभागात व सुशी गावातील प्रतिष्ठीत नागरिकांशी संपर्क साधला. त्यावेळी हा कुणीही अधिकारी नसून गावातील दारूविक्रेता असल्याचे स्पष्ट झाले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पार पाडली.हालेवारात महिलांनी पकडली सात हजारांची दारूएटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथे हॉटेल व्यवसायासह अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या महिलेला बचत गटाच्या महिलांनी सात हजार रूपयांच्या दारूसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सुनीता सरदार (४०) असे आरोपी महिलेचे नाव आहे. हालेवारा येथील नागरिकांनी सुनीता सरदार या महिलेला हॉटेल व्यवसाय करण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली होती. परंतु सदर महिला हॉटेल व्यवसायासह अवैधरित्या दारूविक्रीचा व्यवसाय करायला लागली. काही लोकांना ती धानाच्या बदल्यात दारू पुरवठा करायची. त्यामुळे त्रस्त झालेल्या बचत गटाच्या महिलांनी माजी पं. स. सभापती ललीता मट्टामी यांच्या मार्गदर्शनात अवैध दारूविक्रेत्या महिलेच्या हॉटेलवर धाड टाकून सात हजार रूपये किंमतीच्या दारूच्या ७० निपा जप्त केल्या.
वनरक्षक असल्याची बतावणी करणाऱ्याकडून दारू जप्त
By admin | Published: October 07, 2016 1:38 AM