शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अभियंत्यांचे वेतन प्रलंबित

By admin | Published: May 12, 2016 1:23 AM

सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सात अभियंत्यांचे आॅक्टोबर २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीतील ...

सेवेला मुदतवाढही नाही : सहा महिन्यांचेगडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सात अभियंत्यांचे आॅक्टोबर २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीतील सहा महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. तसेच या कंत्राटी अभियंत्यांच्या सेवेला शासनाकडून अद्यापही मुदतवाढ मिळाली नाही. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्गखोली, किचन शेड, शौचालय व इतर बांधकामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र या प्रश्नाबाबत राज्य सरकार उदासीन आहे.सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अधिनस्त ५४ साधन व्यक्ती, ७८ अपंग समावेशीत शिक्षण, १२ लेखा लिपीक, १५ संगणक परिचालक व सात अभियंते अशा एकूण १६६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली अहे. अभियंते वगळून इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानात जवळपास १३ ते १४ शाखा आहेत. यामध्ये बांधकाम, मोफत पाठ्यपुस्तक, संगणक, अपंग समावेशीत शिक्षण, शाळाबाह्य विद्यार्थी, हंगामी वसतिगृह व इतर शाखांचा समावेश आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत जि.प. शाळांमध्ये सन २०१५-१६ या वर्षात एकूण ५९ किचनशेडचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कामांसाठी शासनाकडून निधीही प्राप्त झाला आहे. यापैकी जवळपास २० कामे सुरू आहेत, असे असतानाही शासनाने बांधकामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अभियंत्यांच्या सेवेला मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे कंत्राटी अभियंते चिंताग्रस्त आहे.(स्थानिक प्रतिनिधी)मार्च २०१७ पर्यंत मुदतशहरी व ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने राज्य शासनाने २००३ पासून सर्व शिक्षा अभियान सुरू केले. या अभियान प्रकल्पाची मुदत मार्च २०१७ अखेरपर्यंत आहे. त्यानंतर शासन या प्रकल्पाची मुदत वाढविते की काय हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. सर्व शिक्षा अभियान प्रकल्पाला मुदतवाढ न दिल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांवर संकट कोसळणार आहे.