लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रशिक्षण कालावधीत नव्या उत्साहात असलेला प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरूत्साही होऊन जातो. त्यामुळे त्याचा व्यवसाय सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी नेहमी उत्साही राहून आपल्या उद्योग उभारणीत तत्पर राहावे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले.बँक आॅफ इंडियाद्वारा संचालित स्टार व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोलीद्वारा १० दिवसीय मशरूम उत्पादन प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.संदीप कऱ्हाळे, डॉ.पुष्पक बोथीकर, बँक आॅफ इंडियाच्या कृषी अधिकारी माधवी ओहोळ, संस्थेचे संचालक एस.पी.टेकाम, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक शेषराव नागमोती, हेमंत मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी डॉ.संदीप कऱ्हाडे यांनी मशरूमसाठी नवनवीन बाजारपेठ शोधून परंपरागत पिकांना फाटा देऊन नवनवीन उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांनी मनोदय ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन अश्विनी भांडेकर यांनी केले तर आभार एस.पी.टेकाम यांनी मानले. प्रशिक्षणार्थी सूरज खोब्रागडे व वृंदा खुणे यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी प्रज्ञा शेंडे, विजय पत्रे, सुनील पुण्यमवार यांनी सहकार्य केले.
उद्योजकांनी नेहमी उत्साहित राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:02 AM
प्रशिक्षण कालावधीत नव्या उत्साहात असलेला प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरूत्साही होऊन जातो. त्यामुळे त्याचा व्यवसाय सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी नेहमी उत्साही राहून आपल्या उद्योग उभारणीत तत्पर राहावे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले.
ठळक मुद्देमशरूम उत्पादन प्रशिक्षणाचा समारोप : उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन