शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

जंगलातील आगींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

By admin | Published: May 30, 2017 12:46 AM

मानवाने खूप प्रगती केली असली तरी सामाजिक प्रगती मंदावली आहे.

जंगलतोडही कारणीभूत : तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदारही लावतात वणवेलोकमत न्यूज नेटवर्ककोरची : मानवाने खूप प्रगती केली असली तरी सामाजिक प्रगती मंदावली आहे. भौतिक सुखाकरिता मानवी मूल्यांची पायमल्ली होत असल्याने निसर्गप्रेम लोप पावत आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण, शेतीविकास, जैविक विकास, अर्थकारण आदी आधुनीकीकरणाच्या नावाखाली जंगलतोड आणि जंगलाना आगी लावणे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.सध्या तेंदूपत्ता हंगाम जिल्हाभरात सुरु आहे. यामुळे दुर्गम भागातील आदिवासी, शेतकरी, मजुरांना रोजगार प्राप्त होत आहे, हे सत्य असले तरी अल्प पैशाच्या लालसेपोटी तेंदूपत्ता ठेकेदारांसोबत संगनमत करुन जास्त व दर्जेदार तेंदू पाने मिळण्याच्या हव्यासापोटी अख्खे जंगल भस्मसात केल्या जात आहे. ठेकेदारांच्या खुटकटाईच्या पैशाची बचत होत असली तरी यामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होत आहे. जंगलाला आगी लावल्यामुळे जंगलातील गवतवर्गीय वनस्पती, कीटक, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, पक्षी आदी वन्यप्राण्यांना याची झळ बसत आहे. यामुळे जंगलातील श्वापदे गावाकडे धाव घेत आहेत. देसाईगंज-आरमोरी मार्गावर कित्येकांना वाघाचे दर्शन होत आहे. हे त्याचेच द्योतक आहे. पर्यावरणाचे अर्थात वृक्षांचे संरक्षण करणे आणी संवर्धन करणे हे सजीव सृष्टीच्या भविष्यकालीन अस्तित्वासाठी गरजेचे आहे. लोकसंख्या जितक्या वेगाने वाढत आहे तितक्या वेगाने स्त्रोत वाढू शकले नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळे प्रामुख्याने हवा, पाणी, जमीन, वनस्पती, मृदा या स्त्रोतांवर विपरीत परिणाम आपसूकच पडतांना दिसून येत आहे. दूषितीकरण हरितगृह परिणाम, वातावरण होणारा बदल, ओझोन वायूचा होणारा क्षय, आम्लपर्जन्य, सागरी परिसंस्थाचा असमतोल, पशुप्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आजपर्यंत तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांची ठेकेदारांकडून पिळवणूक झाली. शासनाच्या हे लक्षात आले. ही पिळवणूक थांबावी व मजुरांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या उद्देशाने ग्रामसभांना हे अधिकार दिले. जंगल जाळण्याचे अधिकार त्यांना दिलेले नाही, हे येथे महत्त्वाचे. मात्र यावर्षी सदर तेंदूपत्ता तोडाईच्या नावाखाली कित्येक जंगले नष्ट केली गेली आहेत. मार्च महिन्यात खुटकटाई होते. निसर्गाचे तापमान कमीच असते. मग याच महिन्यात जंगलाना आगी का लागतता हे आता सर्वश्रूत झाले आहे. जंगल जळण्याला एकटा ठेकेदार जबाबदार नाही तर तेवढेच जबाबदार ग्रामसभेचे पदाधिकारीही आहेत. जंगलतोडीचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास वनसंपती कायमची नष्ट होईल.