चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोणा कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची घटना पोलीस स्टेशन हद्दीत घडू नये तसेच गावातील लोकांवरील जादूटाेणा, अनिष्ट रूढी, परंपरा यांच्यावर विश्वास न ठेवता त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी मार्कंडा गावात अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी विविध उदाहरणे व प्रात्यक्षिक दाखवून अंधश्रद्धा कशी पसरवली जाते व लोक त्याला कसे बळी पडतात हे पटवून देण्यात आले. याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी जादूटोणा कायद्यांतर्गत विविध गुन्हे व कलम यावर मार्गदर्शन करून गावकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे नागरिकांना आवाहन केले. या कार्यक्रमाला मार्कंडा व बामनपेठ येथील १०० ते १५० नागरिक हजर होते. सदर कार्यक्रमाला सरपंच वनश्री चापले, मुख्याध्यापक बी.टी. घोडाम, ग्रामपंचायत सदस्य विजय बहिरेवार, नंदकिशोर सिडाम, माजी सरपंच गंगाधर पोटवार, ग्रामपंचायत सदस्य भरती पोटवार, पोलीसपाटील भाऊजी सिडाम व गावकरी उपस्थित होते.
मार्कंडा येथे अंधश्रद्धा निर्मूलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:38 AM