गडचिराेली जिल्ह्यातील शेवटचे टाेक म्हणून सिरोंचा तालुक्याची ओळख आहे. ब्रिटिश काळातील जिल्हा मुख्यालय, विदर्भ प्रांतातील सर्वात जुना तालुका असाही सिराेंचा तालुक्यात लाैकिक आहे. अहेरी व भामरागड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे. परंतु सिराेंचा येथे उपविभागीय कार्यालय नाही. कार्यालयाच्या निर्मितीसाठी अनेक वर्षांपासून आंदाेलने करुन शासनाला निवेदने पाठिण्यात आली. परंतु काहीच उपयाेग झाला नाही. सिरोंचा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय अहेरीला स्थलांतरीत केल्यानंतर सिरोंचासाठीही स्वतंत्र उपविभागीय अधिकारी देणे आवश्यक होते. परंतु राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती कमी पडली. त्यामुळे काहीच उपयाेग झाला नाही. सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समित्यांचे आठ गण आहेत. ३९ ग्रामपंचायती व एक नगरपंचायत असून, तालुक्याची लोकसंख्या जवळपास ऐंशी हजार आहे. त्यामुळे सिरोंचासाठी स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालय निर्माण करावे, अशी मागणी रवी सल्लम यांनी शासनाकडे केली आहे.
सिरोंचात उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:38 AM