लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : पंचायत समितीच्या मार्फत चालविण्यात येत असलेल्या व तालुक्यात एकमेव असलेल्या पेट्रोलपंपावर मागील १५ दिवसांपासून पेट्रोल नाही. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.एटापल्ली येथील पेट्रोल पंप पंचायत समितीच्या वतीने चालविले जाते. एटापल्ली येथील पेट्रोलपंप हे तालुक्यातील एकमेव पेट्रोल पंप आहे. एटापल्ली तालुक्यात २०० पेक्षा अधिक गावे आहेत. या संपूर्ण गावांमधील वाहनधारक एटापल्ली पेट्रोल पंपावरूनच पेट्रोल व डिझेल भरतात. सध्या हलके धान निघण्यास सुरूवात झाली आहे. धान मळण्यासाठी थ्रेशर मशिनचा वापर केला जातो. या मशिनसाठी डिझेलची आवश्यकता आहे. रबी हंगामाच्या मशागतीला व पेरणीला सुरूवात झाली आहे. ग्रामीण भागात सडक, नाल्या बांधकाम केले जात आहे. यावर काम करणाºया वाहनांना दर दिवशी शेकडो लिटर डिझेलची आवश्यकता भासते. एटापल्ली येथे मुख्यालयी राहून शेकडो कर्मचारी ग्रामीण भागात ३० ते ४० किमी अंतरावर ये-जा करतात. त्यांना दर दिवशी किमान एक ते दोन लिटर पेट्रोलची गरज भासते.एटापल्ली येथील पेट्रोलपंपावर मागील १५ दिवसांपासून पेट्रोलच उपलब्ध नाही. त्यामुळे वाहनधारकांची फार मोठी अडचण होत आहे. ग्राहकांना चार किमी अंतरावर असलेल्या अहेरी किंवा आलापल्ली येथे यावे लागते. यासाठी दीडशे ते दोनशे रूपयांचा खर्च येतो.
धानोरा येथील पेट्रोलपंप ११ दिवसांपासून बंदधानोरा येथे सुद्धा एकच पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपाच्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे या पेट्रोलपंपावरून पेट्रोल मिळणे ११ दिवसांपासून बंद झाले आहे. धानोरा तालुक्यात सुध्दा एकच पेट्रोलपंप आहे. सदर पेट्रोलपंप बंद असल्याने वाहनधारकांची फार मोठी अडचण होत आहे. गडचिरोली, आरमोरी येथून पेट्रोल आणावे लागत आहे. मशीनचे सुटे भाग आल्याशिवाय पेट्रोलपंप सुरू होणार नाही, अशी माहिती पेट्रोलपंपावरील कर्मचाºयाने दिली आहे.दोनच कर्मचाºयांवर भारपेट्रोलचे व्यवहार नगदी राहात असल्याने पेट्रोल खरेदी करण्यासाठी डीडी पाठवावी लागते. मात्र बºयाचवेळा पंचायत समितीचे कर्मचारी वेळेवर डीडी पाठवित नाही. त्यामुळे पेट्रोलचा पुरवठा होत नाही.