लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नाल्यांची नियमित सफाई होऊन सांडपाणी वाहते राहावे, तसेच घराघरातून निघणाऱ्यां कचऱ्यांची वेळीच विल्हेवाट लागावी यासाठी गडचिरोली नगर परिषदेने तब्बल दोन कोटी रुपये खर्चातून दोन कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदारांनी शहर स्वच्छतेचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या तुंबलेल्या असल्याने पाऊस पडताच डासांची उत्पत्ती, रोगराईत वाढ होण्याची शक्यता आहे.शहरातील रस्त्यांची सफाई करण्यासाठी नगर परिषदेकडे १५ पुरूष आणि ९ महिला असे २४ स्थायी कर्मचारी आहेत. मात्र शहरातील संपूर्ण १२ प्रभागांमधील नाल्यांचा नियमित उपसा करून उपसलेला गाळ नगर परिषदेच्या खरपुंडी मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात नेऊन टाकण्यासाठी नगर परिषदेने जानेवारी २०१८ मध्ये १ कोटी ४८ लाख ३१ हजार ४८७ रुपयांचा कंत्राट दिला. चंद्रपूरच्या श्री साई अभियंता बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने हा कंत्राट मिळविला. मात्र कंत्राटात दिलेल्या अटींची पूर्तता सदर संस्थेकडून होताना दिसत नाही.कंत्राटातील अटीनुसार दर १५ दिवसातून एकदा नाल्यांमधील गाळ काढणे गरजेचे आहे. त्यासाठी १०८ मजूर आणि काढलेला गाळ घनकचरा व्यवस्थापन केंद्रात पोहोचविण्यासाठी दररोज ६ ट्रॅक्टर लावणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात एवढे मजूर कामावरच नसतात. परिणामी बहुतांश भागात एक ते दिड महिन्यापर्यंत नाल्यांचा उपसा होत नाही.नगर परिषदेसमोरच नाल्या तुंबलेल्याशहर स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या नगर परिषदेच्या कार्यालयासमोर असलेल्या धानोरा मार्गावरील नाल्या दोन्ही बाजुने कित्येक दिवसांपासून स्वच्छ केलेल्या नाहीत. त्यामुळे तिथे दुर्गंधी सुटली आहे. काही दिवसांपूर्वीच नगर परिषदेच्या आवारात रस्त्याच्या कडेला महिला बचत गटाने झुनका भाकर केंद्र लागले आहे. अस्वच्छ नालीच्या शेजारी नागरिकांना झुनका भाकर खावे लागते.कंटेनर तुडूंब भरलेलेसर्व प्रभागातील प्रत्येक रस्त्यावरून दररोज घंटागाड्या फिरवून घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेने श्री गजानन बहुउद्देशिय बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला वार्षिक ५४ लाख ७३ हजार ८०३ रुपयांना कंत्राट दिला. दररोज ८१ मजुर त्यासाठी कार्यरत असणे अपेक्षित आहे. पण तेवढी मजूरसंख्या राहात नसल्यामुळे घंटागाड्या दररोज येतच नाही. याच कंत्राटदाराकडे कंटेनर भरल्यानंतर तो न.प.च्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर नेऊन रिकामा करण्याची जबाबदारी आहे. मात्र अनेक ठिकाणचे कंटेनर कचºयांनी भरले असताना ते अनेक दिवसपर्यंत हलविले जात नाही. परिणामी तिथे दुर्गंधी सुटते. याशिवाय डासांचे प्रमाण वाढते.नाल्यांची सफाई होते, पण आधीच्या कार्यकाळात तयार झालेल्या नाल्यांचा उतार व्यवस्थित नसल्यामुळे पाणी वाहून जात नाही. कंटेनर उचलण्यासाठी एकच पीकअप वाहन आहे. शहरातील मेलेले डुकर उचलण्यासाठीही त्याच वाहनाचा वापर करावा लागतो. त्यामुळे कंटेनर उचलून घन कचरा व्यवस्थापन केंद्रावर कचरा नेऊन टाकण्यासाठी कधी कधी उशीर होतो. न.प.कडे आणखी एक पीकअप वाहन असणे गरजेचे असून ते खरेदी करण्याचा विचार सुरू आहे.- अनिल कुनघाडकर,उपाध्यक्ष तथा सभापतीआरोग्य समिती, न.प. गडचिरोली
२ कोटीच्या कंत्राटानंतरही नाल्या तुंबलेल्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:17 PM
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नाल्यांची नियमित सफाई होऊन सांडपाणी वाहते राहावे, तसेच घराघरातून निघणाऱ्यां कचऱ्यांची वेळीच विल्हेवाट लागावी यासाठी गडचिरोली नगर परिषदेने तब्बल दोन कोटी रुपये खर्चातून दोन कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदारांनी शहर स्वच्छतेचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या तुंबलेल्या असल्याने पाऊस पडताच डासांची उत्पत्ती, रोगराईत ...
ठळक मुद्देपावसाळापूर्व सफाई नाही : कंटेनर कचऱ्याने भरलेले, पाऊस पडताच वाढणार अस्वच्छता