लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासनाच्या आदेशानुसार २३ नाेव्हेंबरपासून जिल्हाभरातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ४६ हजार ५५० विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ हजार ९२६ विद्यार्थी उपस्थित आहेत. उपस्थितीचे प्रमाण १४.८७ टक्के आहे. अजुनही ३९ हजार ६२४ विद्यार्थी शाळेत येत नसल्याचे स्पष्ट हाेत आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद हाेती. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शासनामार्फत दिले हाेते. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. तसेच ऑनलाईन शिकण्याच्या अनेक मर्यादा आहेत. दिवाळीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. पुढील चार महिन्यात परीक्षेचा कालावधी येणार आहे. अशास्थितीत शाळा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे आणखी माेठे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. पहिल्या दिवशी केवळ पाच टक्के विद्यार्थी उपस्थित हाेते. हळुहळू विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, असा अंदाज हाेता. मात्र दुसरा आठवडा आता संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही केवळ १५ टक्के विद्यार्थी हजर आहेत. यातही बहुतांश विद्यार्थी केवळ दहावी व बारावीचे आहेत. नववी व अकरावीचे अनेक विद्यार्थी येत नसल्याची स्थिती आहे. विद्यार्थी उपस्थितीसाठी पालकाची सहमती आवश्यक केली आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सहमतीपत्र भरवून घेतले जात आहे. मात्र अनेक पालकांनी अजुनही सहमतीपत्र दिले नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी उपस्थिती दिसून येत आहे. मात्र तालुका व जिल्हास्तरावरील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय कमी आहे. काेराेनाचे संकट अजुनही कायम आहे. त्यामुळे बरेचशे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाही. दिवाळीनंतर काेराेना रूग्णांची संख्या वाढली हाेती. मागील पाच ते सहा दिवसांपासून मात्र रूग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे शिक्षकांनी पालकांना मार्गदर्शन करून त्यांचे मन वळविण्याची गरज आहे.
आठवडा संपूनही 40 हजार विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 5:00 AM
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद हाेती. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शासनामार्फत दिले हाेते. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. तसेच ऑनलाईन शिकण्याच्या अनेक मर्यादा आहेत. दिवाळीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. पुढील चार महिन्यात परीक्षेचा कालावधी येणार आहे. अशास्थितीत शाळा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे आणखी माेठे नुकसान हाेण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देकाेराेनाची भीती कायमच : अपेक्षेपेक्षा विद्यार्थ्यांची वर्गात उपस्थिती कमी