धानोरा येथे सोडे मार्गावरील मुक्तिपथ तालुका कार्यालयात बुधवार, २ जून रोजी तालुका व्यसन उपचार क्लिनिकचे अनौपचारिक उद्घाटन देवाजी ताेफा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन जाधव, तहसीलदार सी.जी. पित्तुलवार, नायब तहसीलदार देवेंद्र भगत, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील रेड्डी, मुक्तिपथ अभियानाचे संचालक डॉ.मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासींचे दैवत कुपारलिंगो यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग, नगरपंचायत, तहसील कार्यालय इत्यादी शासकीय कार्यालयांत महिन्यातून दोनदा सभेचे आयोजन करून व्यसनमुक्तीसाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजे. विविध विभागातील कर्मचारी व लाभार्थी व्यसनी आढळून आल्यास त्यांना उपचार क्लिनिकमध्ये पाठविले पाहिजे. व्यसनी रुग्णांना उपचार घेण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहनही देवाजी तोफा यांनी केले.
दुर्गम धानोरा तालुक्यात मुक्तिपथ अभियानातर्फे महिन्यातील पहिल्या व तिसऱ्या बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व्यसन उपचार क्लिनिक सुरू राहणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी एकूण १३ व्यसनी रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा संकल्प केला. अक्षिता येल्लूरकर यांनी रुग्णांना समुपदेशन केले. सूत्रसंचालन संतोष सावळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुक्तिपथ तालुका प्रेरक भास्कर कड्यामी, अक्षय पेद्दीवार यांनी सहकार्य केले.
===Photopath===
030621\03gad_1_03062021_30.jpg
===Caption===
उद्घाटन करताना सामाजिक कार्यकर्ते देवाजी ताेफा.