लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : कोरोना लॉकडाऊनच्या काळात मागील १५ दिवसांपासून टमाटेसह इतर पालेभाज्यांचे भाव प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लाल होत आहेत. आष्टी येथे शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात टमाटेचे भाव ८० ते १०० रुपये किलो पोहोचले होते. चंद्रपूर शहर लॉकडाऊनमुळे टमाटे व इतर भाजीपाल्याची आष्टीच्या बाजारात आवक घटली होती. परिणामी भाववाढीने कहर केला.मागील आठवड्यात आष्टी येथील बाजारात ५० रुपये किलो दराने विकले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण चंद्रपूर शहर लॉकडाऊन करण्यात आले. चंद्रपूर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे. परिणामी दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी येथील बाजारात चंद्रपूरच्या बाजारातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणल्या जातो. मात्र चंद्रपूर शहर लॉकडाऊन झाल्याने शुक्रवारी येथील बाजारात टमाट्याची आवक पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. परिणामी एकाही विक्रेत्याने प्रती किलो ८० रुपयांच्या खाली टमाटे विकले नाही. आजुबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांकडील भाजीपाला बाजारात आणण्यात आला. परिणामी पालेभाज्यांचेही भाव वाढले होते. चंद्रपूर शहरातील बाजारपेठ ३१ जुलैपर्यंत पूर्णत: बंद राहिल्यास आष्टी येथील बाजारात टमाटेचे भाव १२५ ते १५० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आष्टीच्या बाजारात चंद्रपूरच्या ठोक मार्केटमधून भाजीपाल्याची आवक दर आठवड्याला होत असते. मात्र तिथून आवक बंद झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत.चामोर्शी शहरात भरणाऱ्या दैनंदिन गुजरी बाजारातही गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव वधारलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून आवक बंद झाली आहे.गडचिरोलीतील गुजरी महागलीकोरोना लॉकडाऊनमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गडचिरोली शहर व जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ दर रविवारला कडकडीत बंद असते. परिणामी गडचिरोलीच्या दैनंदिन गुजरी बाजारात शुक्रवारी व शनिवारला ग्राहकांची भाजीपाला खरेदीसाठी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे येथे भाजीपाल्याचे भाव वधारलेले असतात. १७ जुलै रोजी शुक्रवारला येथील दैनंदिन गुजरी बाजारात टमाटे ८० रुपये किलो दराने विकले जात होते. वांगे ४० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये किलो, कोबी ८० रुपये किलो, आलू ४० रुपये किलो, कारले ८० रुपये किलो, चवळी शेंगा ५० ते ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत. पालक, मेथी, चवळी, भाजी व कोथिंबीरचे भावही वाढले होते.
टमाट्यांचे दर पाहून सर्वसामान्यांचे डोळे लाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 9:52 PM
आष्टी येथे शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात टमाटेचे भाव ८० ते १०० रुपये किलो पोहोचले होते. चंद्रपूर शहर लॉकडाऊनमुळे टमाटे व इतर भाजीपाल्याची आष्टीच्या बाजारात आवक घटली होती. परिणामी भाववाढीने कहर केला. मागील आठवड्यात आष्टी येथील बाजारात ५० रुपये किलो दराने विकले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण चंद्रपूर शहर लॉकडाऊन करण्यात आले.
ठळक मुद्दे८० ते १०० रुपये किलो : चंद्रपूर शहरातील लॉकडाऊनचा परिणाम, मागणीच्या तुलनेत आवक घटली