लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : पंचायत समिती क्षेत्रामध्ये विकासकामे करण्याकरिता निधीची आवश्यकता असून पंचायत समिती सदस्यांना कुठल्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे विकासकामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. सदस्यांना निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मुलचेरा तालुक्यातील सर्व पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकला.स्थानिक पंचायत समिती सभागृहात १९ जानेवारी रोजी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेवर बहिष्कार टाकून सदस्यांनी तहसीलदार व बीडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदनात, पंचायत समिती गणाचा विकास करण्यासाठी विकास निधी वार्षिक ५० लाख रूपये देण्यात यावे, घरकूल वाटपात कोटा निश्चित करून प्रति सदस्य ५ घरकूल देण्यात यावे, सभापती व उपसभापती यांना पूर्णवेळ वाहन उपलब्ध करून देण्यात यावे, पंचायत समिती सभापती यांना २० हजार, उपसभापती यांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, सदस्यांना ५ हजार रूपये प्रवासभत्ता देण्यात यावा, सदस्यांना १ हजार रुपये बैठक भत्ता देण्यात यावा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पं. स. सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा, बाजार समितीवर प्रत्येक पंचायत समितीमधून १ सदस्य संचालकपदी नेमण्यात यावा, सभापती व उपसभापती व सदस्यांना पेन्शन लागू करावी आदी मागण्यांचा समावेश होता. सदर निवेदन संवर्ग विकास अधिकारी मुकेश मोहोर यांनी स्वीकारले.निवेदन देतांना मुलचेरा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा येमुलवार, उपसभापती बासू मुजुमदार, सदस्य सतीश विधाते, प्रगती बंडावार, सरिता तोरे, गुरुदास तिम्मा व पं. स. सदस्य उपस्थित होते.
पं.स.सदस्यांचा सभेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:33 AM
पंचायत समिती क्षेत्रामध्ये विकासकामे करण्याकरिता निधीची आवश्यकता असून पंचायत समिती सदस्यांना कुठल्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे विकासकामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
ठळक मुद्देमुलचेरा तालुका : तहसीलदार व बीडीओंमार्फत पाठविले निवेदन