सध्या धानाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने भारनियमनामुळे धानाला पंपाद्वारे पाणी देणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी रडकुंडीस आला आहे. भारनियमनामुळे धानाला पाणी पुरवण्यास त्याला मोठी कसरत करावी लागत आहे. रात्र-रात्र जागूनही तो धानाला पाणी पुरवू शकत नाही. बळिराजा हवालदिल झाला आहे. शेतातील उभे पीक हातात येणार की नाही, या विचारात आहे. ग्रामीण परिसरातील जनता भरउन्हाळयात वीज भारनियमनामुळे प्रचंड त्रस्त झाली आहे. सध्या परीक्षेचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांचेसुद्धा नुकसान होत आहे. या लोडशेडिंगमुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. येत्या सोमवारपर्यंत सोळा तास अखंडित वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने न केल्यास, भारनियमन (लोडशेडिंग) बंद न केल्यास परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत आंधळी चिखली फाट्यावर मंगळवारी (दि. ६एप्रिल) चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा चंदेल यांनी दिला आहे.
कृषिपंपांना भारनियमनातून वगळा, अन्यथा ६ एप्रिलला चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:37 AM