शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

आवलमरीतील पाण्याचे कुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:06 AM

आपल्याला निसर्गाचे चमत्कार अनेक ठिकाणी दिसतात़ असाच एक निसर्गाचा अनोखा चमत्कार अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे बघायला मिळतो़ अहेरी तालुका राजनगरी म्हणून सर्वदूर परिचयाचा असला तरी या तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) गावातील उकळत्या पाण्याचे कुंड येथील खास आकर्षण आहे़

आपल्याला निसर्गाचे चमत्कार अनेक ठिकाणी दिसतात़ असाच एक निसर्गाचा अनोखा चमत्कार अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे बघायला मिळतो़ अहेरी तालुका राजनगरी म्हणून सर्वदूर परिचयाचा असला तरी या तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) गावातील उकळत्या पाण्याचे कुंड येथील खास आकर्षण आहे़ हे कुंड तालुक्यात पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. आवलमरी गावातील हे पाण्याचे कुंड तालुक्यासह गडचिरोली जिल्हा आणि शेजारच्या जिल्ह्यातील आदिवासींकरिता श्रद्धा, तर वैज्ञानिकांसाठी संशोधनाचे केंद्र बनले आहे. दरवर्षी आदिवासी बांधव या ठिकाणी एकत्रित येतात आणि आपल्या आदिम देवीदेवतांचे येथे पूजन करतात. या कुंडाबाबत अनेक आख्यायिकादेखील प्रसिद्ध आहेत. या आश्चर्यकारक कुंडाजवळ टाळी वाजविल्यास कुंडातील पाणी उकळल्यासारखे हलायला लागते. टाळीचा आवाज जितका जास्त असेल तितकी कुंडातील हालचाल देखील जलद गतीने होते. विशेष म्हणजे ही सर्व हालचाल केवळ पाण्याच्या आतील भागातच सुरू असते. वरील स्तरावर मात्र पाणी संथ दिसते. टाळी वाजविताच जणू गरम पाण्याला उकळी यावी तसे पाण्यात तरंग निर्माण होतात़ आदिवासी या कुंडातील पाणी उकळते असे सांगत असले तरी कुंडातील पाण्यात केवळ उकळी आल्यासारखा भास होतो. मात्र पाणी प्रत्यक्षात उकळत नाही. दरवर्षी या ठिकाणी आदिवासी मोठ्यासंख्येने एकत्र येतात तेव्हा या परिसरात जुन्या परंपरेनुसार कोंबडे, बोकडांचे बळी दिले जातात. मात्र आदिवासी नागरिक या कुंडात उतरण्याची आणि पाण्यास स्पर्श करण्याची परवानगी देत नाहीत. एवढे मात्र खरे की, पर्यटकांना निसर्गाची एक निराळीच किमया या ठिकाणी निश्चितच अनुभवण्यास मिळते. या ठिकाणी सुरुवातीला सहा ते सात कुंड होते. त्यावेळी त्यांचे आकार देखील मोठे होते. कालांतराने काही कुंड नाहीशे झाले. आता केवळ तीन -चार कुंड शिल्लक आहेत, असे या परिसरातील जुन्या पिढीतील नागरिक सांगतात. निसर्गाच्या या चमत्काराची कारणे वैज्ञानिक शोधत आहेत. मात्र हा तालुक्यातील दुर्गम भाग असल्याने त्यात अडचणी येत आहेत. येत्या काळात या कुंडाचे रहस्य नक्कीच उलगडेल अशी अपेक्षा आहे. हा भागात दुर्गम असल्याने येथे पर्यटकही कमी येतात़ घनदाट रानाची हिरवळ अनुभवत निसर्गाचा हा चमत्कार बघून पर्यटक आपसूकच नतमस्तक होतो़ आदिवासीबांधवांचे हे श्रद्धास्थळ पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ होणे आवश्यक आहे़वैेज्ञानिक दृष्टीने आवलमरीचा कुंड संशोधनाचा विषय असला तरी आदिवासी बांधवांच्या श्रद्धेचे स्थान आहे. दोन्ही बाबींचा विचार करून या स्थळाचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल.

टॅग्स :Waterपाणी