- मनोज ताजने गडचिरोली : जिल्ह्यात पोलीस दलाकडून राबविल्या जात असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान दोन दिवसांत ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून पोलीस दलासाठी खरेखुरे ‘हीरो’ ठरलेल्या जवानांना सरकारी खर्चाने विदेशवारीवर पाठविले जाणार आहे. यात जवळपास ५० जणांचा समावेश राहणार आहे.२२ व २३ एप्रिल २०१८ रोजी गडचिरोली जिल्ह्यात सी-६० या पोलीस दलाच्या विशेष पथकाने नक्षलवाद्यांशी दोन हात केले होते. २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील इंद्रावती नदीजवळ कसनापूर-बोरियाच्या जंगलात पहिली, तर २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदलाजवळच्या कोपेवंचा जंगलात दुसरी चकमक झाली होती. या चकमकींत जिल्हा पोलीस दलाच्या सी-६० पथकासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीनेही योगदान दिले होते. दोन दिवसांत तब्बल ४० नक्षल्यांना मारण्याची ही घटना संपूर्ण देशात नक्षलविरोधी अभियानातील पहिलीच मोठी घटना ठरली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या गृह विभागाने केलेल्या तरतुदीनुसार अशी विशेष कामगिरी करणाºया राज्य पोलीस दलाच्या जवानांना प्रोत्साहन म्हणून विदेशाची सहल घडविली जाणार आहे.>पाच वर्षांपूर्वीच केली होती तरतूदतत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी या अभियानात विशेष कामगिरी बजावणाºया कर्मचाºयांना त्यांच्या कामगिरीच्या व्याप्तीनुसार राज्यात, देशात किंवा विदेशात सहलीसाठी पाठविण्याची तरतूद करावी, असा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविला होता. त्याला तत्कालीन महासंचालकांनी मंजुरी दिली. त्यानुसार यापूर्वी काही कर्मचाºयांना सहलीवर जाण्याची संधी मिळाली आहे.
नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांना विदेशवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 4:40 AM