लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट परिसरातील माडेआमगाव येथे लाखो रूपये खर्चुन सौरऊर्जेवरील दुहेरी पंप पाणीपुरवठा योजना निर्माण करण्यात आली. सदर योजना दीड वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या योजनेवरील झालेला खर्च पाण्यात गेला असल्याची टीका होत आहे.माडेआमगाव येथील पाणीटंचाई लक्षात घेऊन गावात सौरऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणीपुरवठा योजना निर्माण करण्यात आल्या. त्यापैकी प्रभाग क्र.१ मधील पाणीपुरवठा योजना मागील दीड वर्षापासून बंद आहे. ज्या हातपंपावर योजना बसविण्यात आली आहे. सदर हातपंप बंद पडला आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा योजनेचे पाईप तुटले आहे. त्यामुळे पाणी टाकीपर्यंत पोहोचत नाही. या प्रभागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन सदर योजना दुरूस्त करावी, अशी मागणी प्रभाग क्र. १ मधील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली. मात्र दीड वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामपंचायतीने सदर योजना दुरूस्ती केली नाही. त्यामुळे लाखो रूपये खर्चुनही या प्रभागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे हातपंपाच्या सभोवताल सिमेंट काँक्रिटचा मार्ग बनविण्यात आला. त्यामुळे हातपंप सुद्धा बंद पडले आहे. योजना बंद असताना नळातून पाणी काढता आले असते तर पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली असती. मात्र हातपंपही नादुरूस्त आहे.
सौरऊर्जा योजनेवरील खर्च पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:31 AM
घोट परिसरातील माडेआमगाव येथे लाखो रूपये खर्चुन सौरऊर्जेवरील दुहेरी पंप पाणीपुरवठा योजना निर्माण करण्यात आली. सदर योजना दीड वर्षांपासून बंद आहे.
ठळक मुद्देदीड वर्षांपासून बंद : माडेआमगाव येथील नागरिकांना पाणीटंचाईची झळ