शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खरगी गावात निघाली दारूची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:52 PM

तालुक्यातील खरगी गावातील नागरिकांनी दारू विरोधात एल्गार पुकारत चक्क दारूची अंत्ययात्रा काढली. या दारूच्या तिरडीला गावच्या पोलीस पाटलांनी खांदा दिला. खरगीवासीयांच्या दारूबंदीच्या या अनोख्या उपक्रमाची तालुकाभरात चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देअनोखा उपक्रम : दारूपेक्षा मोहाच्या झाडाचे महत्त्व अधिक, पोलीस पाटलांनी दिला तिरडीला खांदा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील खरगी गावातील नागरिकांनी दारू विरोधात एल्गार पुकारत चक्क दारूची अंत्ययात्रा काढली. या दारूच्या तिरडीला गावच्या पोलीस पाटलांनी खांदा दिला. खरगीवासीयांच्या दारूबंदीच्या या अनोख्या उपक्रमाची तालुकाभरात चर्चा सुरू आहे.आदिवासी ‘सायबे मावा संस्कृती ते दांडगो मनवेके बताल कबाड आयो, दांडगो नावा संस्कृतीते मंता आदिनसाठी मावा नाटे दांडगो आयो पर्रो.’ दारू हा आदिवासींच्या संस्कृतीचा भाग आहे. दारूशिवाय माझ्या संस्कृतिक कोणतेच काम होत नाही. त्यामुळे माझ्या गावातील दारू बंद होऊ शकत नाही, असे वाक्य दारूबंदी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना, मुक्तीपथच्या पदाधिकाऱ्यांना ऐकायला मिळतात. मात्र दारूचे दुष्परिणाम लक्षात आलेल्या खरगी येथील आदिवासी नागरिकांनी गावात दारूबंदीचा ठराव घेतला. दारू ही आपल्या गावाला लागलेली कीड असून ही कीड भावी पिढीलाही लागण्याची शक्यता गावकºयांनी व्यक्त करून गावात दारूबंदीची अंमलबजावणी करण्याचा ठाम निर्णय घेतला. नागरिकांमध्ये दारूबंदीविषयी जनजागृती करण्यासाठी चक्क दारूचीच अंत्ययात्रा काढण्यात आली. तिरडीला गावचे पोलीस पाटील रामभाऊ नराटे, लोमेश नरोटे, काशिराम नरोटे, दयाराम टेकाम यांनी खांदा दिला. समोर डफरा वाजवत ‘दारूवरती हल्ला बोल’, ‘दारू बंद म्हणता’ अशा घोषणा देण्यात आल्या. या अंत्ययात्रेत गावातील आबालवृध्द सहभागी झाले होते. लोमेश नरोटे यांनी आदिवासी संस्कृतीत मोहाच्या दारूपेक्षा मोहाच्या झाडाला महत्त्व आहे. मोहाच्या झाडाची साल काढून जरी पाण्यात बुडविली आणि ती पाणी शिंपडले तरी आमचे देव प्रसन्न होतात. दारू पिण्यामुळे जुन्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. नवीन पिढ्या उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी गावात दारूबंदी होणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन केले. सदर अंत्ययात्रा मुक्तीपथचे धानोरा संघटक सागर गोतपागर, प्रेरक भास्कर कड्यामी, अक्षय पेद्दिवार, रवी अलोणे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.