धर्मदीक्षा सोहळा : विनायक तुमराम यांची मागणीगडचिरोली : राज्य शासनाने परधान जमातीसह इतर १७ जमातींचा मानववंशीय अभ्यास करण्याचे जाहीर केले आहे. या अभ्यासाचा नेमका उद्देश काय, हे राज्य शासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.पेसा कायद्याची संकल्पना व वास्तव यात कमालीचा फरक आढळतो. पेसा ही संकल्पना सुस्पष्ट झाली नाही. त्यामुळे आदिवासी व गैरआदिवासींमध्ये भावनिक दुरावा निर्माण होत चालला आहे. पेसा कायद्याची चांगली अंमलबजावणी करण्यासाठी यामध्ये बदल करण्याची गरज आहे. आदिवासी धर्म दीक्षा सोहळा पुढील वर्षी १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला जाईल. यासाठी जमिनीचा शोध गडचिरोलीत सुरू आहे, अशी माहिती प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी दिली आहे.पत्रकार परिषदेला सुनील कुमरे, पीतांबर कोडापे, वामनराव जुनघरे, वनीश्याम येरमे, संतोष आत्राम, खुशाल मरस्कोल्हे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
परधान जमातीच्या अभ्यासाचा उद्देश स्पष्ट करा
By admin | Published: November 01, 2015 1:57 AM