लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरोग्य व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचरांना केवळ १ हजार २०० रूपये मानधन दिले जाते. मागील अनेक वर्षांपासून मानधनात वाढ केली नाही. मानधन वाढीचा लढा तीव्र करणार, असा निर्धार अंशकालीन स्त्री परिचरांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या सभेत केला.ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी सहायक परिचरिका सांभाळतात. त्यांना मदत करण्यासाठी अंशकालीन स्त्री परिचर नेमण्यात आले आहेत. नाव जरी अंशकालीन असले तरी या स्त्री परिचरांना सहायक परिचारिकेसोबत पूर्णवेळ काम करावे लागते. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंशकालीन स्त्री परिचर सहायक परिचारिकेच्या खांद्याला खांदा लावून काम करते. शासनाकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम अंशकालीन स्त्री परिचरशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शासनाकडून महिन्याकाठी केवळ १ हजार २०० रूपये मानधन दिले जाते. मानधनवाढीचा लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.सभेला जिल्हाभरातील १०० पेक्षा अधिक अंशकालीन स्त्रीपरिचर उपस्थित होत्या. अंशकालीन स्त्री परिचर संघटना ही महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेसोबत संलग्न ठेवण्याचा ठराव घेण्यात आला.यावेळी जिल्हा कार्यकारिणी नव्याने गठित झाली. जिल्हाध्यक्षपदी रेखा सहारे, कार्यकारी अध्यक्ष उषा मडावी, कार्याध्यक्ष कविता चंदनखेडे, कोषाध्यक्ष तरूणा पवार, सरचिटणीस भूमिका सेलोटे, उपाध्यक्ष जया घुगुसकर, उर्मिला सोरते, पंचफुला लिंगे, माधुरी मेश्राम, सहसचिव वैशाली शास्त्रकार, लक्ष्मी गावडे, संगमा खोब्रागडे, सुरेखा केळझरकर, सल्लागार वच्छला मारबते, जनकाबाई नरोटे, जयवंता उसेंडी, शिलाबाई रायपुरे, संघटक, श्यामल सहारे, संगीता गंडाते, भारती ठलाल, सुनीता गेडाम, संयोज लाडे, वर्षा मडावी, रेखा शंभरकर, प्रसिद्धी प्रमुख जयश्री हुर्रा, बायजाबाई लेनगुरे, रूखमा वेलादी, रजनी नागोसे, लोकमुद्रा खोब्रागडे, सदस्य संगमा खोब्रागडे, कुसूमबाई मरस्कोल्हे, व्ही.जी.गावडे, वनीता नंदेश्वर, किष्टूबाई उडता, श्यामलता कुंभारे, संगीता मडावी, रेखा सहारे, वनीता नंदेश्वर, सुनीता मडावी, माधुरी हजारे यांची बिनविरोध निवड झाली.१० वर्षांपासून मानधनात वाढ झाली नाहीअंशकालीन स्त्री परिचरांना शासन महिन्याकाठी केवळ १ हजार २०० रूपये मानधन दिले जाते. १२ ते १५ वर्षांपूर्वी शासनाने १ हजार २०० रूपये मानधन लागू केले होते. त्यानंतर मात्र मानधनात वाढ केली नाही. वाढत्या महागाईमध्ये १ हजार २०० रूपये मानधन अत्यंत नगण्य आहे. इतर वस्तू तर सोडाच महिन्याचा किराणा सुद्धा होत नाही. आज ना उद्या मानधनात वाढ होईल, या अपेक्षेने काम करीत आहेत. शेतीवर जाणाºया मजुराच्या तुलनेतही कमी मानधन मिळते. मानधनात वाढ व्हावी, यासाठी राज्यभरातील अंशकालीन स्त्री परिचरांनी अनेकवेळा आंदोलन केले. शासनाला निवेदन सादर केली. मात्र त्यातून अनुदानात वाढ करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तुटपुंज्या मानधनातून संसाराचा गाडा चालविणे अशक्य असल्याने अंशकालीन स्त्री परिचर निराश झाल्या आहेत.
स्त्री परिचर अनुदानाचा लढा तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 1:36 AM
आरोग्य व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचरांना केवळ १ हजार २०० रूपये मानधन दिले जाते. मागील अनेक वर्षांपासून मानधनात वाढ केली नाही.
ठळक मुद्दे१ हजार २०० रूपये माधनावर बोळवण : सभेत केला निर्धार, जिल्हाभरातील अंशकालीन स्त्री परिचरांची उपस्थिती