शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

अंगारा येथील टॉवरची रेंज वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:24 AM

गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी गडचिरोली: गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कत्तलीसाठी जात असलेली जनावरे ...

गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी

गडचिरोली: गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कत्तलीसाठी जात असलेली जनावरे पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी आहे. गोरक्षण संस्था निर्माण करण्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

प्रसूतिगृह निर्मितीचे बांधकाम रखडले

एटापल्ली : तालुक्यातील उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृह निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, यातील काही उपकेंद्रांतील प्रसूतिगृहाचे बांधकाम रखडले आहे. संस्थेंतर्गत प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सदर प्रसूतिगृहांचे बांधकाम होणे गरजेचे आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्यसेविका कमी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३६ आरोग्य पथके व ३७६ उपकेंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करते. मात्र, जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दरहजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे.

प्रवासी निवाऱ्यावर शेडची मागणी

आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक जुने प्रवासी निवारे आहेत. वादळामुळे अनेक निवाऱ्यांचे छत उडाले आहे. प्रशासनाने जुन्या प्रवासी निवाऱ्यांवर नव्याने शेड उभारावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पुलाचे बांधकाम करण्याची मागणी

झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होते.

मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करा

सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधावी, अशी मागणी हाेत आहे.

चामोर्शी मार्गावर गतिरोधक उभारा

आष्टी : घोट व चामोर्शीकडे जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक निर्माण करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर गतिरोधक निर्माण करावे.

अनावश्यक फलक हटविण्याची मागणी

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे.

पशुवैद्यकीय अधिकारीच नाही

कुरखेडा : तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुपालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पशुधनही धोक्यात आले आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तत्काळ भरण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे.

शहरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डांतील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष आहे.

मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष

एटापल्ली : तालुक्यातील अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात अद्यापही अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे नागरिकांना विकासासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रशासनाकडूनही समस्या साेडवण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.

रामगड परिसरात फवारणी करा

कुरखेडा : रामगड-पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. नियमित फवारणीकरिता वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी

अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी, जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.

ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण वाढले

मुलचेरा : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.

टिपागड परिसराला अभयारण्याचा दर्जा द्या

कुरखेडा : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़ या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे़ शिवाय, येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़

दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी

गडचिरोली : अपुऱ्या दूधपुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गोगावनजीकचे नागोबा देवस्थान दुर्लक्षितच

गडचिरोली : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची पंचाईत होते.

रुग्णवाहिकांची संख्या वाढवा

गडचिरोली : गावपातळीवरील रुग्णांना अतिमहत्त्वाच्या उपचारासाठी खासगी वाहनाने रुग्णालयात शहरात जावे लागते. अनेकदा वाहनेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना अनेकदा आपल्या प्राणाला मुकावे लागते.

बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण

धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने मुंगनेर, पेंढरी भागातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

पिशव्यांमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात

गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लॉस्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

झाडांच्या फांद्यांनी झाकोळले पथदिवे

आष्टी : परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. महावितरणच्या कर्मचा-यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ

भामरागड : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतक-यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.

कन्नमवारनगरात डासांचा प्रादुर्भाव

गडचिरोली : कन्नमवारनगरातील अनेक नाले तुंबले असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

अंकिसा : येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

अनेक अंगणवाडी केंद्रे भाड्याच्या खोलीत

गडचिरोली : जिल्हाभरातील ५० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी केंद्रे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही प्रशासनाने स्वतंत्र इमारती बांधल्या नाही. परिणामी, पूर्वप्राथमिक शिक्षणावर परिणाम हाेत आहे.