कोविड -१९ विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.
नागपूर विभागातील महाविद्यालयामध्ये सन २०२०-२१ मध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. विभागातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण नागपूर विभाग, नागपूर डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.