आमरस म्हटले की, अनेकांच्या ताेंडाला पाणी सुटते, शिवाय उन्हाळ्यात अनेक व्यक्ती गाेड चव असलेल्या आंब्याची निवड करीत आमरसाचा आस्वाद घेतात. मुलीसह जावई व कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तिंना आमरसाचा पाहुणचार करण्याची प्रथा अजूनही ग्रामीण भागात जाेपासली जात आहे. आमरसासाेबत शेवया तसेच इतर खाद्यपदार्थ सेवन केले जातात. गडचिराेली शहरासह जिल्ह्याच्या बऱ्याच भागात विविध प्रजातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये नीलम, केशर, लंगडा, हापूस व गावरान आदींचा समावेश आहे. या आंब्यांचा आस्वाद घेणे अनेकांच्या आवाक्यात राहात नाही. मात्र, यंदा भाव कमी असल्याने बऱ्याच घरी चांगल्या प्रतीचे आंबे आणून त्याचा रस करण्यावर भर दिला जात आहे.
निर्बंधांमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे काही आंबा उत्पादक व विक्रेते घरपाेच सेवा देत असल्याचे दिसून येते.
बाॅक्स .....
आवक वाढली, मात्र ग्राहकांची संख्या राेडावली
निसर्गाने साथ दिल्यामुळे यंदा गावठी आंबे बहरून आले. त्यामुळे इतर आंब्यांचेही उत्पादन माेठ्या प्रमाणात आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत निर्बंध लावण्यात आले. दरम्यान, आंब्याची आवक वाढली असली तरी ग्राहकांची संख्या राेडावली आहे. अनेक ग्राहक संसर्गाच्या भीतीने बाजारपेठेत जाऊन आंबे खरेदी करीत नसल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स .....
आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत
काेट .....
यावर्षी अवकाळी वादळी पावसामुळे आंबे गळून पडले. तसेच जे आंबे झाडाला लागून आहेत. ते लाॅकडाऊनमुळे ताेडू शकत नाही. यावर्षी आमचे नुकसान झाले. - पांडुरंग भाेयर, आंबा उत्पादक
काेट .....
आमच्या शेतात आंब्याची १० ते १२ झाडे आहेत. चवदार गावरान आंबा असल्याने त्याला माेठी मागणी असते. विशेषकरून लाेणचे तयार करण्यासाठी आमच्याकडील आंबे अनेकजण नेतात. मात्र, यंदा काेराेना संसर्गामुळे ग्राहकांकडून आंब्याची फारशी मागणी राहली नाही. परिणामी आंब्याचे भाव उतरवावे लागले. - सीताराम वाकुडकर, आंबा उत्पादक.
काेट ......
ग्रामीण भागात यावर्षी बेंगनपल्ली आंब्याला अधिक मागणी आहे. अनेक ग्राहक आंबे खरेदीसाठी तयार असतात. मात्र, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावल्यामुळे दरराेज शहरात नेवून आंबे विक्री करण्यास अडचण आहे. वेळ कमी असल्याने हमीभावात आंब्याची विक्री करून माेकळे व्हावे लागते. यावर्षी धंद्यावर परिणाम झाला आहे. - वासुदेव टेभुर्णे, आंबा व्यापारी.
बाॅक्स...
हाेलसेल भाव
केशर - १०० रुपये किलाे
बैगनपल्ली - ६५ रुपये किलाे
दशहरी - ७० रुपये किलाे
लंगडा - ६० रुपये किलाे
गावठी - ४० रुपये किलो
आंब्याची चिल्लर किंमत
केशर - ११० रुपयेपये किलाे
बैगनपल्ली - ८० रुपये किलाे
दशहरी - ८० रुपये किलाे
लंगडा - ७० रुपये किलाे
गावठी - ५० रुपये किलो