शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रूग्णालय सीसीटीव्हीच्या नजरेत

By admin | Published: April 21, 2017 1:07 AM

जिल्हा सामान्य रूग्णालयातील वॉर्ड, मुख्य दरवाजे, वॉर्डाचे दरवाजे, कॅरिडॉर, ओपीडी विभाग या ठिकाणी सुमारे ३८ सीसीटीव्ही ...

३८ कॅमेरे लागले : रूग्णालयातील प्रत्येक हालचालीवर शल्य चिकित्सकांचे लक्षगडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील वॉर्ड, मुख्य दरवाजे, वॉर्डाचे दरवाजे, कॅरिडॉर, ओपीडी विभाग या ठिकाणी सुमारे ३८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागल्याने संपूर्ण रूग्णालय सीसीटीव्हीच्या नजरेत आले आहे. त्यामुळे या ठिकाणी घडणाऱ्या अनुचित प्रकारांवर थेट नजर राहण्यास मदत होणार आहे. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात सुमारे २०० खाटांची व्यवस्था आहे. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा दुप्पट रूग्ण दरदिवशी भरती होऊन उपचार घेतात. त्यामुळे या रूग्णालयात नेहमीच रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ राहते. तालुकास्थळावरील रूग्णालयांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथेच दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढते. अलिकडेच लहान मुले पळवून नेणे, डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होणे यासारखे प्रकार वाढत चालले आहेत. या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रूग्णालय प्रशासनाने सुमारे ३८ सीसीटीव्ही कॅमेरे रूग्णालय परिसरात लावले आहेत. या कॅमेरांचे मॉनिटरींग जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कॅबिनमध्ये ठेवण्यात आले आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या खोलीमध्ये सुध्दा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असल्याने या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरामुळे जिल्हा रूग्णालयात घडणाऱ्या प्रत्येक बाबीवर तसेच असामाजिक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून जिल्हा शल्य चिकित्सकांची नजर राहण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)