लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुष्काळ परिस्थिती, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. अशा शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. शेतकºयांना दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागू नये, त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सुविधा निर्माण करून शेतकºयांना समृद्ध करणार, असे प्रतिपादन आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बुधवारी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील २४ शेतकरी बांधवांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, प्रभारी जिल्हाधिकारी सुरेश चौधरी, सहायक जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपनिबंधक माधुरी पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची प्रक्रिया साडेतीन महिन्यात पूर्ण झाली. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर बळीराजाला दिवाळीची भेट म्हणून राज्य शासनाने शेतकºयांची कर्जमाफी करून त्यांची दिवाळी गोड केली, असेही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यावेळी म्हणाले. निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे व शेतकºयांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे बँकांचे कर्ज फेडण्यास शेतकºयांना अडचणी येतात. नव्याने कर्ज घेणे शेतकºयांना कठीण होते. अनेक वर्ष शेतकरी कर्जाच्या ओझ्यात राहतो. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीवर मात करण्यासाठी कर्जमाफीचे नियोजन करण्याचे ठरविले. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकºयांची कर्जमाफी करण्यात येईल, असे सांगितले होते.त्याअनुषंगाने सर्व आॅनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा राज्यस्तरावरील शुभारंभ मुंबईत पार पडला. आता पालकमंत्री या नात्याने आपण कर्जमाफीबाबतचे तसेच कर्ज भरलेल्यांना प्रोत्साहनपर लाभ प्रमाणपत्राचे वितरण करीत आहे, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. कर्जमाफी योजनेची कार्यवाही गतीने केल्याबाबत पालकमंत्री ना. आत्राम यांनी जिल्हा प्रशासन, सहकार विभागाचे उपनिबंधक, राष्टÑीयकृत बँकेच्या अधिकाºयांचे यावेळी कौतुक केले. कार्यक्रमात प्रभारी जिल्हाधिकारी चौधरी, जि. प. अध्यक्ष भांडेकर, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, नगराध्यक्ष पिपरे आदींनी कर्जमाफीबाबत मनोदय व्यक्त करीत शेतकºयांनी ज्या कामासाठी कर्ज घेतले आहेत, त्याच कामासाठी वापर करून ते कर्ज परत करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक उपनिबंधक माधुरी पांडे, संचालन सहायक निबंधक पाटील यांनी केले.
शेती सिंचनाची सुविधा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:59 PM
दुष्काळ परिस्थिती, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. अशा शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमुक्तीचा निर्णय घेतला.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : कर्जमाफी योजनेअंतर्गत २४ शेतकºयांना प्रमाणपत्राचे वितरण