जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढीवर असताना जिल्हाभरात अपुऱ्या सोयीसुविधांबाबत जनसामान्यांतून ओरड सुरू होती. जनतेला होणाऱ्या त्रासाची दखल घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी जिल्हाधिकारी व आ. नागो गाणार यांना कोविड केंद्रावर अपुऱ्या सोयीसुविधा असल्याचे लक्षात आणून दिले. आ. नागो गाणार यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील कोविड केंद्रावरील सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
तालुक्यात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोविड लसीकरण हाेणार आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना कुठलीही अडचण होणार नाही यासाठी तालुक्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांच्याकडे करण्यात आली आहे. सध्या दोन अतिरिक्त लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.