शहरं
Join us  
Trending Stories
1
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
2
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
5
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
6
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
7
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
8
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
9
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
10
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
11
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
12
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
13
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
14
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
15
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
16
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
17
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
18
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
19
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
20
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार

पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना केसीसी पोर्टलद्वारे सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 5:00 AM

शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने kccgad.com या नावाने पीककर्ज पाेर्टल सुरू केले आहे. विशेष म्हणजे, ज्या अर्जदारांनी २०२०-२१ खरीप हंगामात या पोर्टलद्वारे कर्जाची मागणी केली व अर्ज परिपूर्ण सादर केले, अशा अर्जदारांना पुन्हा २०२१-२२ खरीप हंगामाकरिता कर्ज मागणी करायची असेल, तर फक्त नूतनीकरण या एका क्लिकचा वापर करून अर्ज भरता येईल.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागतात. यात त्यांना बराच त्रास हाेताे व वेळही वाया जाताे. हा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मागीलवर्षी केसीसी पोर्टल सुरू करण्यात आले हाेते. याहीवर्षी केसीसी पाेर्टलची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा उपयाेग करून शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने kccgad.com या नावाने पीककर्ज पाेर्टल सुरू केले आहे. विशेष म्हणजे, ज्या अर्जदारांनी २०२०-२१ खरीप हंगामात या पोर्टलद्वारे कर्जाची मागणी केली व अर्ज परिपूर्ण सादर केले, अशा अर्जदारांना पुन्हा २०२१-२२ खरीप हंगामाकरिता कर्ज मागणी करायची असेल, तर फक्त नूतनीकरण या एका क्लिकचा वापर करून अर्ज भरता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी kccgad.com या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. बँकांकडून शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे अकारण नाकारणे तसेच टाळाटाळ करणे यासारख्या प्रकारावर आता जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण राहणार आहे. तसेच पोर्टलद्वारे शेतकऱ्यांनी किती अर्ज केले, बँकांनी किती पात्र ठरविले किंवा नाकारले, यावर सनियंत्रण राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांना इंटरनेट किंवा पोर्टल वापरण्याची सुविधा नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा गावस्तरावरील आत्माचे शेतकरी मित्र, बँक सखींची मदत घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

असा करावा अर्ज... शेतकऱ्यांनी kccgad.com या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर आवश्यक सूचना वाचाव्यात. ‘क्लिक हिअर टू अप्लाय’वर जावे. पोर्टलद्वारे यापूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ नूतनीकरण करावे लागणार आहे. नवीन कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘न्यू’वर क्लिक करून अर्ज सादर करावा. आवश्यक माहिती भरून अर्ज ऑनलाईन जमा करावा. सदर अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर तो पुन्हा वाचून सबमिट करावा. त्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून बँकेत आवश्यक कागदपत्रांसह जमा करावे. अर्ज सादर केल्याची पावती अथवा पोहाेच घ्यावी. यानंतर पुन्हा बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या पीक कर्जाच्या अर्जाचा तपशील ‘क्राॅप लाेन अप्लिकेशन स्टेटस’ या माेबाईल ॲपवरही पाहता येईल.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जagricultureशेती