लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महिला रुग्णालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या गांधी चौकातील पानठेल्यांना सील लावण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील इतरही पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पानठेला चालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे.तंबाखू नियंत्रण कायदा २००३ अन्वये शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयांपासून १०० मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध आहे. तसेच शासनाने राज्यभरात गुटखा, सुगंधित तंबाखू यांच्या विक्रीवरही बंदी घातली आहे. तरीही गडचिरोली शहरात सुगंधित तंबाखापासून बनलेल्या खऱ्यांची खुलेआम विक्री केली जात होती. शासकीय रुग्णालयापासून १०० मीटर अंतरावर असलेले पानठेले हटवावे, अन्यथा नगर परिषद स्वत: कारवाई करून पानठेले उचलेल, असे नोटीसद्वारे बजाविले होते. त्यानंतर गुरूवारी प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात केली. चौकातील पानठेल्यांना सील ठोकण्यात आले. खर्रा बनविण्याची मशीन, प्लास्टिक पन्नी ताब्यात घेण्यात आली. डॉ.नंदू मेश्राम यांनी पानठेलाधारकांचे समूपदेशन केले व सहकार्य करण्याचे आवाहन केले. लवकरच नगर परिषद गडचिरोली येथे सर्व पानठेलाधारकांची सभा बोलावून त्यामध्ये त्यांना तंबाखू नियंत्रण कायदा व मौखिक आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दंडात्मक व प्रबोधनात्मक कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.सदर मोहीम मुख्याधिकारी संजीव ओहोळ, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे डॉ.नंदू मेश्राम, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे, नगर परिषदेचे कर्मचारी सुधाकर भरडकर, अविनाश बंडावार, प्रशांत चिचघरे, अमोल कांबळे, गणेश ठाकरे, एस.सोनटक्के, दिनेश धोटे, किशोर सेमस्कर यांनी केली.शिवसेना आंदोलन करणारपानठेले बंद झाल्यास शहरातील शेकडो युवकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. सदर युवक बेरोजगार होणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पहिलेच बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. पानठेले बंद झाल्याने ही समस्या तीव्र होणार आहे. पानठेल्यांवर कारवाई करण्याऐवजी ज्या ठिकाणावरून तंबाखूचा पुरवठा होतो, तेथील कारखाने बंद करावे, नगर परिषदेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल, छाया कुंभारे, संतोष मारगोनवार, राजू गावडे उपस्थित होते.शहरभर तपासणी मोहीमनगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी दिवसभर धानोरा, चामोर्शी, आरमोरी, मूल मार्गावरील पानठेल्यांची तपासणी केली. ज्या पानठेलाधारकांकडे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा आढळून आला, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तीन पानठेलाधारकांकडून १५ हजार रूपये दंड व पाच दुकानदारांकडून प्लास्टिक वापराबाबत २ हजार ६०० रूपये दंड वसूल केला.
चौकातील पानठेल्यांना ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:20 AM
महिला रुग्णालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या गांधी चौकातील पानठेल्यांना सील लावण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील इतरही पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : गडचिरोली शहरातील खर्रा विक्रेते हादरले