लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने आरमोरी शहरातील १०५ घरांची पडझड झाली होती. यापैकी काही नागरिकांचा निवारा पूर्णत: कोसळल्याने त्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. असे कुटुंब भाड्याच्या घरात तसेच नातेवाईकांकडे सध्या वास्तव्य करीत आहेत. परंतु हे बेघर झालेले कुटुंब घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत.आरमोरी नगर पंचायत क्षेत्रातील अनेक घराची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती. काही लोकांच्या घरांचे अंशत: तर अनेक लोकांचे घर पूर्णत: कोसळले. अंशत: कोसळलेले घर पावसाळ्यात पूर्णत: कोसळेल या भीतीने निर्गमित करण्यात आले. घरांची पडझड झाल्यानंतर महसूल विभागातर्फे पंचनामे करून काही स्वरूपात मदत देण्यात आली. परंतु ही मदत तुटपुंजी होती. शहरातील विविध वॉर्डात वास्तव्य करणाऱ्या अनेक नागरिकांचे घर कच्च्या स्वरूपाचे व मोडकळीस आलेले होते. अशांनी पूर्वीच नगर परिषदेकडे घरकुलासाठी अर्ज सादर केला होता. परंतु घरकूल मंजूर होण्यापूर्वीच यंदाच्या अतिवृष्टीमुळे या नागरिकांचे घर पूर्णत: कोसळले. आवास योजनेंतर्गत शहरी भागातील गरजू कुटुंबांना घरकुलांचा लाभ दिल्या जातो. परंतु घरकुलाची यादी तयार करताना गरजूंना प्राधान्य दिले जात नाही. अतिवृष्टीमुळे घर कोसळलेल्या नागरिकांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन घरकूल मंजूर करणे आवश्यक आहे. अशांना नगर परिषदमार्फत विशेष सहाय्य निधीतून घरकूल द्यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबांकडून होत आहे.विशेष म्हणजे पडझड झालेल्या १०५ घरांपैकी अनेक कुटुंब भाड्याच्या खोलीत वास्तव्य करीत आहेत. यात त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. नगर परिषदेने नुकसानग्रस्तांना घरकूल त्वरित द्यावे, अशी मागणी अनेक कुटुंबांकडून होत आहे.शासन स्तरावरची घरकूल प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे नियमाप्रमाणे क्रमांकानुसार घरकूल मंजूर होतात. अतिवृष्टी अगोदर अडीचशे घरकूल मंजूर झाले होते. आता नव्याने यादी पाठविली आहे. लवकरात लवकर मंजूर करण्याचा प्रयत्न करू.- हैदरभाई पंजवानी, उपाध्यक्ष, न. प. आरमोरी.
‘ते’ कुटुंब घरकुलाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 6:00 AM
आरमोरी नगर पंचायत क्षेत्रातील अनेक घराची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती. काही लोकांच्या घरांचे अंशत: तर अनेक लोकांचे घर पूर्णत: कोसळले. अंशत: कोसळलेले घर पावसाळ्यात पूर्णत: कोसळेल या भीतीने निर्गमित करण्यात आले. घरांची पडझड झाल्यानंतर महसूल विभागातर्फे पंचनामे करून काही स्वरूपात मदत देण्यात आली.
ठळक मुद्देपावसाळ्यात झाली होती पडझड : आरमोरीतील अनेक जण बेघर