लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : उत्तम नाेकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, अशी संपूर्ण समाजरचना सध्या तयार झाली आहे. त्यामुळे मुलीचे लग्न जुळविताना नाेकरी असलेला मुलगा प्राधान्याने शाेधला जाताे तर शेतकरी असलेल्या मुलांना मुली देण्यासाठीसुद्धा वधू-पिता तयार हाेत नाही. त्यातून शेतकरी कुटुंबांची अवस्था फार वाईट झाली आहे. एकूणच शेतकरी नवरा नकाे बाई, असा सूर वधू कुटुंबीयांकडून काढला जात आहे. डाॅक्टर, इंजिनिअर, हायप्राेफाईल जावई पाहिजे, अशी अपेक्षा वधुपिता व्यक्त करतात. याशिवाय मुलगा, खेड्यात राहणारा नसावा, ताे शहरात वास्तव्याला असेल तरच मुलगी दाखविण्यासाठी मंडळी तयार असतात. अनेकदा तर मुलगा शेती व्यवसाय करताे, असे म्हणून बऱ्याचदा मुलीही दाखविल्या जात नाही. समाजातील शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकाेन आजही अतिशय वाईट आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मुलांचे लग्नकार्य जुळविण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहे. तालुका, जिल्हा स्थळासाेबतच माेठ्या शहरांमध्ये मुली देण्यासाठी वधूपिता उत्सुुक असतात. व्यापारी अथवा मुलगा कुठलाही व्यवसाय करत असेल तर सामान्य घरातील मुलगी त्याला दिली जाते.
अटी मान्य असतील तर बाेला...सद्य:स्थितीत लग्न ही एक जाेखमेची बाब म्हणून शेतकरी कुटुंबाला वाटत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कुटुंबांमध्ये मुली देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात असणारा मुलगा हवा. ताे एकटाच असावा. त्याला बहीण-भाऊ नसावे, अशा अटी बरेच कुटुंबीय टाकत असतात. मुलांकडूनही सुंदर दिसणारी मुलगी निवडली जात आहे. अपेक्षा पूर्ण हाेत असेल तरच लग्न जुळून येत आहेत.
सर्वाधिक मागणी डाॅक्टरांना सर्वाधिक मागणी डाॅक्टर व अभियंत्यांना आहे. असे स्थळ असेल, तरच आमची मुलगी दाखवू असे वधूपित्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मुली शाेधताना अडचणी येत आहेत. सद्य:स्थितीत वधूपित्याचे भाव वधारले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील, गरीब घरातील मुलगी असली तरी वधूपिता जे वाक्य बाेलेल ते वरपित्याला मान्य करावे लागेल. अन्यथा लग्न जुळणे कठीण आहे. शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी देण्यासाठी वधूपिता तयार नाही. शेतकऱ्यांकडे व त्यांच्या कुटुंबाकडे पैसा राहत नाही. शेती निसर्गावर अवलंबून आहे. यामुळे वधूपिता शेतकरी कुटुंबाला मुलगी द्यायला तयार नाही.
शेती व्यवसाय हा चांगला असला तरी त्यात धाेके अनेक आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायात बऱ्याचदा नुकसान हाेत असते. माझ्याकडे सात एकरापेक्षा अधिक शेती आहे. मात्र, मुलाचे लग्न जुळविण्यासाठी याेग्य मुलगी मिळत नसल्याचे समस्या आहे. - पांडुरंग लटारे, वरपिता
पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान हाेते. मुलगा काय करताे, याला महत्त्व नव्हते तर शेती किती आहे, कुटुंबीय कसे आहेत, त्याची प्रतिष्ठा कशी आहे. या बाबीला महत्त्व दिले जात हाेते. मात्र, आता बदल झाला आहे. मुलगा शेती करताे, असे सांगितले की, प्रतिसाद मिळत नाही.- नीळकंठ तिवाडे, वरपिता
लग्नकार्यात मुलीच्या विराेधात जाता येत नाही, पूर्वी आई-वडील, कुटुंबातील लाेकांनी पसंत केलेला मुलगा, स्थळ नाकारले जात नव्हते. मात्र, आता काळानुरूप बदल झाला आहे. आता मुलीच्या मनाला प्राधान्य आहे. शेवटी तिचे आयुष्य सुखी जावाे, अशीच आई-वडिलांची इच्छा असते. - लक्ष्मण गाेटा, वधूपिता
मुलगी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मुलगा नाेकरी असलेला मिळेल तर आम्ही नक्कीच लग्नासाठी तयार हाेऊ. नाेकरी किंवा व्यवसाय करणारा मुलगा असावा, अशी मुलीची इच्छा आहे. -भक्तदास चुधरी,वधूपिता