लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली अंतर्गत १ ते ३१ जुलैै दरम्यान कृषी कल्याण अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने वाघोली येथे बुधवारी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जनावरांचे लसीकरणही करण्यात आले.कार्यक्रमाला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाडे, विषय विशेषतज्ज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर, विषय विशेषज्ज्ञ (पशु व दुग्धशास्त्र) डॉ. विक्रम कदम, तालुका कृषी अधिकारी व्ही. ए. राजपूत, कृषी अधिकारी व्ही. एस. वाळवी, पशु वैैद्यकीय अधिकारी डॉ. नैैताम, हेमंत उंदीरवाडे, सरपंच दुर्गा पाल, पोलीस पाटील गेडाम, कृषी मित्र गुरू बुरांडे, गजानन बुरांडे उपस्थित होते.डॉ. प्रकाश पवार यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उत्पादनात वाढ करावी, त्याकरिता मृदा परीक्षण करून आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्यावी, जोड व्यवसाय म्हणून भाजीपाला लागवड, कुकुटपालन, अळींबी उत्पादन व्यवसाय करावा, असे आवाहन केले. संदीप कºहाडे यांनी यांत्रिकीकरणाचा वापर फळबाग लागवड करावी, असे आवाहन केले.याप्रसंगी राजपूत, बोथीकर, कदम, नैैताम यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागामार्फत प्रातिनिधीक स्वरूपात कृषी निविष्ठांचे शेतकºयांना वाटप करण्यात आले.
वाघोली येथे शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 12:44 AM
कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली अंतर्गत १ ते ३१ जुलैै दरम्यान कृषी कल्याण अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने वाघोली येथे बुधवारी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
ठळक मुद्देकृषी विज्ञान केंद्राचा पुढाकार : शिबिरात जनावरांचे लसीकरण