शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: May 27, 2017 1:12 AM

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अहेरीला २४ मे पर्यंत अहेरी, महागाव, इंदाराम, देवलमरी, आवलमरी,

अहेरी तालुक्यातील शेतकरी वंचित : सोसायट्यांनी एनसीएस अहवाल पाठविलाच नाही ए.आर. खान । लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अहेरीला २४ मे पर्यंत अहेरी, महागाव, इंदाराम, देवलमरी, आवलमरी, राजाराम येथील आदिवासी विविध सहकारी संस्थांनी एनसीएस (पीक कर्ज प्रस्ताव) सादर केला नाही. त्यामुळे ३३७ पेक्षा अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत. पीक कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात उभा होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या मार्फत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी बँकेकडून कर्ज घेण्यास प्रथम प्राधान्य देत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा ग्रामीण भागात असल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जाची उचल करतात. सहकारी बँक सहकारी सोसायट्या व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फत कर्जाचे वितरण करते. कर्ज वितरणासाठी संबंधित सोसायटीने सहकारी बँकेकडे पीक कर्ज प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. मात्र खरीप हंगाम जवळ आला असतानाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे संबंधित सोसायट्यांनी एनसीएस अहवाल सादर केला नाही. त्यामुळे पीक कर्जाचे वितरण रखडले आहे. पाऊस पडल्याबरोबर शेतकरी पेरणीच्या कामाला सुरुवात करतात. ऐन वेळेवर धांदल उडू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वीच बियाणे, खते खरेदी करतात. त्यासाठी पैशाची आवश्यकता भासते. मात्र शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक कर्ज वितरित झाले नाही. त्यामुळे बियाणे, खते कसे खरेदी करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जवळपास ३३७ पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी पीक कर्जासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. मात्र अजूनपर्यंत सोसायटीने शेतकऱ्यांचे अर्ज बँकेकडे सादर केले नाही. परिणामी कर्जाचे वितरण थांबले आहे. बँकेकडून कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे व्हावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांमध्ये सोसायट्यांविषयी संतापाची भावना निर्माण झाली आहे. सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करावे, अशी मागणी शेतकरी सभासदांकडून केली जात आहे. बँकेकडे बऱ्याचवेळा रोकडचा तुटवडा निर्माण होत आहे. बँक कर्ज आठ दिवसात वितरित केले तरी रोकड उपलब्ध होण्यास उशिर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. इतर बँकांकडून २० शेतकऱ्यांना कर्ज वाटप अहेरी तालुक्यातील बँक आॅफ इंडियाने १५ शेतकरी सभासदांना १० लाख ९७ हजार, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने तीन शेतकऱ्यांना २ लाख ३४ हजार व बँक आॅफ महाराष्ट्रने दोन शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण केले आहे. सहकारी बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँका पीक कर्जासाठी हात आखडता घेतात. राष्ट्रीयकृत बँका त्यांना दिलेले कर्जाचे उद्दिष्ट कधीच पूर्ण करीत नाही. या बँकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दरवर्षीच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना या बँका हुलकावणी घेतात. कर्जासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.