लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबरोबरच शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.कृषी विभागाची जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा प्रेक्षागार मैदान व क्रीडा व सांस्कृतिक भवन कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी कृषी विभागाच्या कर्मचारी व अधिकाºयांसाठी क्रिकेट, दौड स्पर्धा, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ आदी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. गायन, नृत्य, नाट्य, लावणी, निमिक्री आदी कार्यक्रम घेण्यात आले.बॅडमिंटनमध्ये एस. टी. म्हेत्रे यांच्या टिमने विजेतेपद पटकाविले. बुद्धिबळमध्ये एस. जी. पानसरे यांची टिम, दौडमध्ये कीर्ति सातार, मनोहर दुधबावरे, हेमंत उंदीरवाडे, गोळाफेकमध्ये एस. ए. होलगिरे, कॅरम नितीन मुद्दमवार, क्रिकेट व कबड्डीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय अहेरी, व्हॉलिबॉलमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोलीने विजेतेपद पटकाविले.सर्वाेत्कृष्ट सांस्कृतिक इव्हेंटमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या ‘व्यथा कृषी सहायकांची’ या नाटिकेने पुरस्कार पटकाविला. शीतल हेमके यांना सर्वाेत्कृष्ट कलाकार व प्रीती चिलीमवार यांना सर्वाेत्कृष्ट इंजिनिअरिंग कलाकार म्हणून गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे विभागीय सचिव विजय पत्रे, संचालन क्षीरसागर तर आभार लीलाधर पाठक यांनी मानले. यशस्वीतसाठी शत्रुघ्न म्हेत्रे, अतुल जावळे यांच्यासह कृषी सहायक व कृषी अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी खेळांचा आनंद लुटला.
कृषी विभाग शेतकऱ्यांचा सल्लागार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:45 AM
शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबरोबरच शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.
ठळक मुद्दे खासदारांचे प्रतिपादन : कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा