लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मेडीगड्डा प्रकल्पासाठी तयार केलेला रस्ता व एल अँड टी कंपनीकडून शेतीच्या बाजूला तयार केलेला सिमेंट प्लाँट यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. प्लाँटमधून निघणाऱ्या धुरामुळे पिकाला व नागरिकांना हानी पोहोचत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर दोन लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाल्याने प्रकल्पाचे काम बंद आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, याकरिता गावकऱ्यांनी नायब तहसीलदार यांच्यासोबत २३ मे रोजी पोचमपल्ली गावात बैठक घेऊन प्रति एकर दोन लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, असा ठराव पारित केला. परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही नुकसान भरपाई देण्यात आली नाही.पोचमपल्लीच्या शेतकऱ्यांनी एल अँड टी कंपनीच्या मालवाहक वाहनांना अडविले असल्याने मागील पाच दिवसांपासून कामबंद आहे. चार दिवसांपूर्वी प्रकल्पाच्या अधिकाºयांना नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, त्यांनी वेळ मारून नेली. संबंधित अधिकारी तेलंगणात गेल्याचे बोलले जात आहे. मेडीगड्डा प्रकल्पात अंकिसा, आसरअल्ली, रंगधामपेठा, वडदम, दुब्बापल्ली आदी गावांचा समावेश आहे. या प्रकल्पात कामासाठी गावातील स्त्री व पुरूषांना ठेवण्यात आले आहे. मेडीगड्डा प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असल्याने माल वाहतूक करणारी वाहने राष्ट्रीय महामार्गावर थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे अन्य वाहनांच्या वाहतुकीसही अडथळा आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मेडीगड्डा प्रकल्प बांधण्याची परवानगी दिली त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी रवींद्र येरय्या सल्ला, रमेश पोचम सल्ला, श्रीनिवास राजाराम गोर्रे, विजेंद्र राजन्ना सल्ला, श्रीनिवास नारायण सल्ला व गावकऱ्यांनी केली आहे.
भरपाईसाठी शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:15 AM
लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मेडीगड्डा प्रकल्पासाठी तयार केलेला रस्ता व एल अँड टी कंपनीकडून शेतीच्या बाजूला तयार केलेला सिमेंट प्लाँट यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. प्लाँटमधून निघणाऱ्या धुरामुळे पिकाला व नागरिकांना हानी पोहोचत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर दोन लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी ...
ठळक मुद्देमेडीगड्डाचे प्रकल्पग्रस्त : पाच दिवसांपासून काम बंद; पीक व नागरिकांच्या आरोग्यास धोका