लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मालेवाडा केंद्रावर मागील दोन महिन्यांपासून धान खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांचे चुकारे वेळेवर होत नसल्याने चुकाºयांसाठी शेतकºयांची पायपीट वाढली आहे.तालुक्यातील मालेवाडा परिसर धान व मिरची पिकाकरिता प्रसिद्ध आहे. दिवसेंदिवस मिरचीची लागवड परवडत नसल्याने अनेक शेतकरी धान पिकाकडे वळले आहेत. या परिसरात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने बहुतांश शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावरच धानाची विक्री करतात. धानासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी शेतकरी धान निघाल्याबरोबर धानाची विक्री करण्याची लगबग सुरू करतात. धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून या केंद्रावर मागील दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल सव्वा कोटी रूपयांच्या धानाची विक्री झाली आहे. मात्र एकाही शेतकऱ्याला अजूनपर्यंत धानाचे चुकारे मिळाले नाही. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे थकले आहेत. चुकारे कधी मिळणार, याबाबत महामंडळाच्या अधिकाºयांना तसेच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शेतकरी वेळोवेळी विचारणा करीत आहेत. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. आॅनलाईन पद्धतीमध्ये धानाचा काटा झाल्यापासून तीन दिवसात शेतकºयांच्या खात्यात चुकाºयाची रक्कम जमा होईल, असे आश्वासन आदिवासी विकास महामंडळ व शासनाने दिले होते. मात्र दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही चुकारे मिळाले नाहीत. अनेक केंद्रांवर पुरेशा प्रमाणात बारदाना उपलब्ध नाही. बारदाना आणाल तरच धानाची खरेदी केली जाईल, असे अडेलतट्टू धोरण आदिवासी विकास महामंडळाने अवलंबिले आहे. बारदान्याची खुल्या बाजारात २५ ते ३० रूपये असताना शेतकऱ्यांना केवळ २० रूपये दिले जात आहेत. प्रत्येक पोत्यामागे जवळपास १० रूपयांचे नुकसान शेतकºयांना सहन करावा लागत आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान भिजले. याचेही नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ चुकारे देण्यात यावे, अशी मागणी मालेवाडा येथील शेतकरी कपील पेंदाम, राकेश नागोसे, सुखदेव उईके, नीलकंठ उईके, विनायक नैताम, महारू वाटगुरे, पुरूषोत्तम पेंदाम, गणपत नागोसे या शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.पलसगड केंद्रावर ३ हजार १०० क्विंटल धान खरेदीकुरखेडा तालुक्यातील पलसगड येथील आधारभूत धान खरेदी केंद्र १३ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत या केंद्रावर ३ हजार १०० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. परंतु अजूनपर्यंत या केंद्रावरील शेतकऱ्यांचे चुकारे झाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. केंद्राचे व्यवस्थापक ठलाल यांना विचारणा केली असता, सर्व शेतकऱ्यांची यादी कुरखेडा येथील उपप्रादेशिक कार्यालयात पाठविली आहे, अशी माहिती दिली. मात्र अजूनपर्यंत चुकारे झाले नाही. ३ हजार १०० क्विंटल धानाचे ५४ लाख २५ हजार रूपये एवढी किंमत होते. मात्र एकाही शेतकऱ्याला पैसे देण्यात आले नाही. शेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही लक्ष देणे आवश्यक झाले आहे.
चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:38 PM
आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मालेवाडा केंद्रावर मागील दोन महिन्यांपासून धान खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांचे चुकारे वेळेवर होत नसल्याने चुकाºयांसाठी शेतकºयांची पायपीट वाढली आहे.
ठळक मुद्देदोन महिन्यांपासून कारभार ठप्प : मालेवाडा केंद्रावर सव्वा कोटींचे चुकारे थकले