डीपीसीच्या माध्यमातून कनेक्शन मंजूर केले जातील तसेच शून्य पोलवाल्यांना लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले. ज्यांना ३० ते ३५ लाखांचा निधी लागतो. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. महिला आघाडीतर्फे सुद्धा पालकमंत्री शिंदे यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना ताबडतोब कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येईल, असे कुंभारे यांनी सांगितले.
याप्रसंगी महावितरणचे अधीक्षक अभियंता गाडगे व उपअभियंता वंजारी, अश्विनी भांडेकर, नवनाथ उके, निर्मला संदाेकर, रेमाजी भोयर, शालीकराम म्हशाखेत्री, अतुल हजारे, लहू शेंडे, दादाजी राऊत, अरुण म्हशाखेत्री, दीपक नवले, ऋषी भोयर, विकास म्हशाखेत्री, घनश्याम म्हशाखेत्री, सुमन म्हशाखेत्री, दिवाकर बाणबाले, लोमेश चिमूरकर व शेकडो शेतकरी हजर होते.