लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विहिरगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु येथील ८० टक्के शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे नुकसानभरपाईचा लाभ देऊन तलाठ्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी विहिरगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी आरमोरी तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.आरमोरी तालुक्यातील विहिरगाव येथील शेतकऱ्यांची शेतजमीन नरोटी चक शेतशिवारात आहे. या भागातील शेतकरी निसर्गाच्या अवकृपेचा सामना करीत धानपिकाचे उत्पन्न घेतात. मागील वर्षीच्या हंगामात मावा, तुडतुडाच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. रोगांमुळे निम्मे पीक सुद्धा हाती पडले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनने तलाठी व कृषी सहाय्यकामार्फत रोगग्रस्त पिकांची मोका चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनामा करून सिर्सी साज्याच्या तत्कालीन तलाठ्यांनी नुकसानभरपाईसाठी शेतकºयांची यादी बनविली. मात्र, सदर यादी अद्यापही शासनाकडे पोहोचलेली नाही.परिणामी येथील शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत. नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी व तलाठ्याची चौकशी करावी, अन्यथा तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.सदर निवेदन शिवसेना माजी जिल्हाप्रमुख हरीश मने यांच्या नेतृत्त्वात तहसीलदार धाईत यांना दिले. निवेदन देतेवेळी माजी जि.प.सदस्य वेणू ढवगाये, उपसरपंच तामराव सहारे, हेमराज भोयर, दादाजी सपाटे, तामदेव सेलोटे, वासुदेव मडावी, गिरीधर गेडेकर, बाळाजी कोल्हे, तुकाराम कोवे, रवी सपाटे जीवन ठाकरे, इंदरशहा मडावी, रामदास गावडे, मनीराम कुमोटी, दादाजी भोयर, षदानंद कोसरे, विश्वनाथ चापले, कुसन कोवे, राजाराम सपाटे, अफजल बेग आदींसह विहिरगाव येथील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:33 AM
सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विहिरगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु येथील ८० टक्के शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही.
ठळक मुद्देनुकसानभरपाईची मागणी : मागील वर्षीपासून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत