लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सगुणा पध्दतीत धान रोवणीच्या खर्चाची बचत होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सगुणा पध्दतीने धान लागवडीकडे वळला आहे. यावर्षी दोन हजार हेक्टरवर या पध्दतीने लागवड होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.धानाच्या संपूर्ण लागवड खर्चात धान रोवणीचा खर्च सर्वाधिक राहतो. धानाची रोवणी करताना पºहे खोदणे, चिखलणी करणे, धानाची रोवणी करणे आदी मशागत करावी लागते. यामध्ये एकूण धान लागवड खर्चाच्या निम्मा खर्च धान रोवणीवर होतो. सगुणा पध्दतीत एका विशिष्ट अंतरावर धानाच्या बियांची लागवड केली जाते.प्रत्येक ओळीमध्ये विशिष्ट अंतर राहत असल्याने यंत्राच्या सहाय्याने आंतर मशागतही करता येते. त्यामुळे आंतर मशागतीचाही खर्च वाचते. तसेच या पध्दतीने धानाची लागवड केल्यास धानाचे फुटवे अधिक येऊन उत्पादनात वाढ होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत असल्याने शेतकरी आता या पध्दतीने धान लागवडीकडे वळत चालला आहे. यावर्षी दोन हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सगुणा पध्दतीने धानाची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.महिला आर्थिक विकास महामंडळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, आत्मा यांनीही पुढाकार घेतला आहे.आवत्यासारखीच कमी खर्चाची पद्धतगडचिरोली जिल्ह्यातील काही शेतकरी धानाची रोवणी करण्याऐवजी आवत्या पध्दतीने धानाची लागवड करतात. यामध्ये शेतजमीन नांगरून बियाणे शिंपले जातात. यामध्ये अस्ताव्यस्त बियाणे पडत अल्याने आंतरमशागत करणे शक्य होत नाही. तसेच काही ठिकाणी धानाचे रोपटेच राहत नाही. परिणामी आवत्या पध्दतीने लागवड केल्यास धानाचे उत्पादन कमी होते. आवत्या पध्दती सारखीच सगुणा पध्दत सुध्दा आहे. यामध्ये मात्र बियाणे एका विशिष्ट अंतरावर टिबले जातात. यामुळे धानाची आंतर मशागत करण्यास सोपी होते. तसेच धान पिकाला हवा लागत असल्याने उत्पादनातही वाढ होते.
सगुणा पद्धतीने धान लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:54 PM
सगुणा पध्दतीत धान रोवणीच्या खर्चाची बचत होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सगुणा पध्दतीने धान लागवडीकडे वळला आहे. यावर्षी दोन हजार हेक्टरवर या पध्दतीने लागवड होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठळक मुद्देदोन हजार हेक्टरचे नियोजन : लागवड खर्चात होते कपात