लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पाऊस पडल्यास येत्या आठ ते दहा दिवसांत धानाच्या रोवणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. २० जूनपर्यंत एकूण उद्दिष्टाच्या २२ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. या आठवड्यात कर्ज वितरणाची गती वाढण्याची शक्यता आहे.शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतीचा खर्चसुद्धा वाढत चालला आहे. हा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे राहत नाही. परिणामी शेतकऱ्याला गावातील सावकार किंवा बचत गट यांच्याकडून कर्ज घ्यावे लागते. सावकार किंवा बचत गट यांचे व्याजदर अत्यंत महाग असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. खासगी कर्ज वेळेवर मिळतही नाही. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे वेळेवर होत नसल्याने त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो. या सर्व संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँकाना शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले जाते. २०१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकाºयांना २०२ कोटी ९१ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २० जूनपर्यंत केवळ ११ हजार ११३ शेतकऱ्यांना ४३ कोटी ९१ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या कर्ज वाटपाचे प्रमाण अतीशय कमी आहे. याला गती देणे आवश्यक आहे.बँकनिहाय कर्जाचे वितरणकर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. या बँकेला एकूण ५६ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. २० जूनपर्यंत ८ हजार ६६८ शेतकऱ्यांना २९ कोटी ६१ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँक आॅफ इंडियाने ४ कोटी ५९ लाख, बँक आॅफ महाराष्टÑने २ कोटी ६६ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया १४ लाख, आयडीबीआय बँक ३६ लाख, एसबीआय २ कोटी १४ लाख, युनियन बँक ३४ लाख, विजया बँक २ लाख, एक्सिस बँक ३ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक ४ कोटी २ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. काही शेतकºयांचे मागील १५ दिवसांत कर्जमाफ झाले आहे. हे शेतकरी आता पुन्हा बँकांकडे कर्जासाठी अर्ज करीत आहेत. त्यामुळे कर्ज वितरणाची गती वाढण्याची शक्यता आहे.
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:32 AM
पाऊस पडल्यास येत्या आठ ते दहा दिवसांत धानाच्या रोवणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. २० जूनपर्यंत एकूण उद्दिष्टाच्या २२ टक्केच कर्ज वितरण झाले आहे.
ठळक मुद्देएकूण उद्दिष्टाच्या २२ टक्केच कर्जाचे वितरण : या आठवड्यात कर्ज वितरणाची गती वाढेल