लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : धानाच्या रोवणीचा खर्च प्रचंड प्रमाणात येत असल्याने वैरागड परिसरातील शेतकरी धानाची पेरणी करण्याकडे वळत आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर काही शेतकरी पेरणी करीत आहेत. मात्र हा प्रयोग यशस्वी झाल्यास धानाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.पारंपारिक पध्दतीने धानाची लागवड करताना सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. त्यानंतर सदर पºहे खोदून धानाची रोवणी केली जाते. रोवणी करतेवेळी दोन ते तीन वेळा मागणी करावी लागते. तसेच रोवणीच्या वेळी चिखल सुध्दा करावा लागतो. रोवणीसाठीही बराच मनुष्यबळ लागत असल्याने धान लागवडीचा खर्च वाढतो. मात्र उत्पादनाला मर्यादा आहेत. परिणामी धानाची शेती तोट्याचा सौदा बनत चालला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आरमोरी तालुक्यातील विहिरगाव येथील सचिन सपाटे या शेतकºयाने धानाची पेरणी करणारे यंत्र खरेदी केले. सदर यंत्र ट्रॅक्टरला जोडल्या जाते. या यंत्राने धानाची पेरणी केली जाते. एका विशिष्ट अंतरावर बियाणे पडत असल्याने पेरणी व्यवस्थित होते. बियाणांसोबतच रासायनिक खतांची मात्रा सुध्दा देता येते. ट्रॅक्टरच्या गतीने यंत्र पेरणी करीत असल्याने एका दिवशी दोन ते तीन एकर जागेवर पेरणी शक्य होते. वेळेत पेरणी आटोपल्याने धानाचे पीक चांगले येण्यास मदत होते.
धान रोवणीऐवजी पेरणीकडे वळताहेत शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:21 AM
धानाच्या रोवणीचा खर्च प्रचंड प्रमाणात येत असल्याने वैरागड परिसरातील शेतकरी धानाची पेरणी करण्याकडे वळत आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर काही शेतकरी पेरणी करीत आहेत. मात्र हा प्रयोग यशस्वी झाल्यास धानाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । विहीरगावातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग; धान लागवडीचा खर्च कमी होण्याची अपेक्षा