शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
3
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
4
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
5
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
6
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
7
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
8
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
9
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
10
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
11
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
14
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
15
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
16
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
17
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
18
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
20
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-

लॉकडाऊनमध्ये कळले शेतकऱ्याचे मोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 5:00 AM

दोन वेळचे जेवन मिळावे, यासाठी मजूरवर्ग दिवसभर काम करते. तर हे अन्न तयार करण्यासाठी शेतकरी स्वत:ला वाहून घेते. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. दिवसभर शेतीत राबल्यानंतर त्यालाच दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. मात्र आजपर्यंतच्या सरकारांनी याकडे फारसे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली.

ठळक मुद्देघरी बसून असलेल्या जनतेचे पोट भरण्यात मोलाचा वाटा; कोरोनामुळे मूलभूत गरजा भागविण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये बहुतांश कारखाण्यांना कुलूप ठोकण्यात आले आहेत. तर बुहतांश सेवा बंद केल्या आहेत. मात्र यातून शेतकरी वर्गाला वगळण्यात आले आहे. अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरवठा नियमित सुरू राहील याकडे प्रशासन विशेष लक्ष देऊन आहे. यावरून जनतेला शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल तसेच त्यांनी पिकविलेला माल जीवन जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे कळायला लागले आहे.दोन वेळचे जेवन मिळावे, यासाठी मजूरवर्ग दिवसभर काम करते. तर हे अन्न तयार करण्यासाठी शेतकरी स्वत:ला वाहून घेते. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. दिवसभर शेतीत राबल्यानंतर त्यालाच दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. मात्र आजपर्यंतच्या सरकारांनी याकडे फारसे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. तर चैनीच्या वस्तूंचे उत्पादन करणारे कंपन्यांचे मालक गब्बर बनले. कोरोनाने मात्र जनतेला मूलभूत गरजांची आठवण करून दिली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्याला आता जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटत चालला आहे. यामध्ये चैनीच्या वस्तूंची सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित सुरू राहिल, याकडे लक्ष दिले जात आहे. यावरून नागरिकांना आता शेतीचे महत्त्व कळायला लागले आहे. इतर सर्व उद्योग बुडले तरी शेती पिकणे असणे आवश्यक आहे. सरकारनेही शेतकºयांच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.जगाच्या पोशिंद्याचे महत्त्व नागरिकांना आता कळायला लागले आहे. मात्र याच पोशिंद्याला पेट्रोल मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कर्मचाºयाला कार्ड दाखविल्याबरोबर तो म्हणेल तेवढे पेट्रोल दिले जात आहे. शेतकºयाला मात्र १०० रुपयांच्या वर दिले जात नाही. दुसºया गावावरून भाजीपाला आणताना अडचण होत आहे.अनेकांनी सुरू केली भाजी विक्रीलॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे शहरात मजुरी करण्यासाठी गेलेले नागरिक आता गावाला परतायला लागले आहेत. कंपन्या सुध्दा अनेकांना डच्चू देण्याची शक्यता आहे. शेतकºयावर मात्र लॉकडाऊनचा फारसा परिणाम पडला नाही. भाजीपाला, धान्याची विक्री सुरूच आहे. तसेच शेतीची कामेही सुरू आहेत. बेरोजगार झालेला वर्ग आता पुन्हा शेतीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी