शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

शेतकऱ्यांनाे, खते, बी-बियाणे खरेदीत सावधानता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 5:00 AM

शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीसाठी प्राधान्य द्यावे. बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडे पावतीसह खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टण/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे सीलबंद/मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी. 

ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन : जिल्ह्यात लगबग वाढली

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सध्या धान शेती पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. रोहिणी नक्षत्रावर काही शेतकरी धूळवाफेच्या पेरण्यांना प्रारंभ करीत असतात. त्यासाठी लागणारी खते, बी-बियाणे खरेदी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. मात्र, खरेदी करीत असताना, शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीसाठी प्राधान्य द्यावे. बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडे पावतीसह खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टण/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे सीलबंद/मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी. तसेच कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यांनी तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष/ दूरध्वनी/ ई-मेल/ एसएमएस, आदीद्वारे देऊन शासनाच्या गुणनियंत्रण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषीनिविष्ठांची खरेदी करताना किंमत, मालाबाबत बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

१२ तास सुरू राहतील कृषी केंद्रेn गडचिराेली जिल्ह्यात काेविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुकानांची वेळ व टाळेबंदीबाबत धाेरण आखण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये माेडत असलेली कृषी केंद्र दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे व त्यांच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्याची अनुमती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहे. n बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी साहित्यांचा अडथळ्यांविरहित पुरवठा करणे, कृषी संबंधित कार्य व त्यांच्या संबंधित कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्याबाबत कृषी आयुक्त पुणे यांनी जिल्हा परिषदेला कळविले हाेते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करून कृषी केंद्र सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ ही दिली आहे.

पथकाची नजर राहणारखते, बि-बियाणे, कीटकनाशके आदीसह विविध कृषी निविष्ठांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात शेतकऱ्यांची फसवणूक हाेऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत यावर्षी सुद्धा पाच ते सहा भरारी पथक ठेवण्यात येणार आहे. कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले हे पथक जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांच्या कारभारावर व कृषी निविष्ठांच्या मालावर नजर ठेवणार आहेत. गैरप्रकाराला आळा घालणार आहे.

कृषी अवजारे बनविण्यावर भरग्रामीण भागातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून कृषी व्यवसायात विविध पिकांच्या शेत लावगडीसाठी लागणारे लाकडी अवजारे बनविण्याच्या कामात लागले आहे. गावातील सुताराकडे जाऊन नांगरण, वखर, कुऱ्हाड, टिकास आदींचे दांडे व इतर वस्तू तयार करून घेताना दिसून येत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेती अवजारांची जुळवाजुळव करीत आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती