यावेळी तालुका कृषी अधिकारी टी. डी. ढगे, कृषी पर्यवेक्षक ए. आर. हुकरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. डी. राहांगडाले, कृषी सहायक डी. के. क्षीरसागर, डी. एल. चौधरी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. ढगे यांनी शेतकऱ्यांना ॲझोला कल्चर बनविताना तीन फूट रुंद, दहा फूट लांब व अर्धा फूट खोल टाके तयार करून त्यात शेण, माती, सिंगल सुपर फाॅस्फेटचे मिश्रण करून टाक्यांमध्ये पाणी भरून ॲझोला कल्चर कसे सोडायचे, हे प्रात्यक्षिकातून दाखविले. दर चौरस मीटरला ३०० ग्रॅम ॲझोला धानाच्या बांधीत टाकल्यास दहा ते पंधरा दिवसात त्याची भरघोस वाढ होऊन प्रति हेक्टरी पाच ते दहा टन ॲझोला तयार होऊन पिकास मुक्त नत्र उपलब्ध करून देते. यामुळे युरिया खताची गरज भासत नाही. तसेच दुभत्या जनावरांना दररोज खाद्यान्नामध्ये दिल्यास दुधात फॅटचे प्रमाण वाढते. यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणून दुहेरी फायदा असलेल्या ॲझोला वनस्पतीचे शेतकऱ्यांनी संगोपन करावे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी ढगे यांनी केले.
शेतकऱ्यांनी ॲझोला वनस्पतीचे संगोपन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:45 AM