हवामान खात्याच्या अंदाजानुसार लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली असून, खरीप हंगामालाही सुरुवात होणार आहे त्या धारतीवरच उमेद अभियानांतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी कृषिशाळा घेतल्या जात आहेत. बीज प्रक्रिया बियाणांची उगवण क्षमता, खत व्यवस्थापन भात लागवड, पीक संरक्षण जिवाणू खताची बीज प्रक्रिया, बुरशी नाशक बीज प्रक्रिया, जिवाणू खताची बीज प्रक्रिया, रोग प्रतिबंधात्मक उपाय आदी विषयावर चर्चा करण्यात आली. रासायनिक खतांचा वापर टाळून भात पिकावर बीज प्रक्रिया करण्यासाठी निंबोळी अर्क तयार करून कमीत कमी खर्चात सेंद्रिय शेती करावी, असे आवाहन कृषी व्यवस्थापक गोवर्धन यांनी केले यावेळी कृषी सखी श्वेता गेडाम, नम्रता गेडाम व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:45 AM