लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. वनविभागातर्फे अटल बांबू समृद्धी योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे गडचिरोली वनवृत्त समन्वयक नितीन कावडकर यांनी केले.देशातील बहुतांश ठिकाणी बांबू ही जंगलातील नैसर्गिक वनस्पती आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीमधून व परसबागेत बांबूची लागवड केली जाते. जिल्ह्यातही बांबूपासून वस्तू निर्मिती करणारा मोठा जनसमुदाय आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक भूभाग जंगलांनी व्याप्त आहे. बांबूची मोठ्या प्रमाणात व सहज उपलब्धता आहे. त्यादृष्टीने बांबूचे व्यवसायिक प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे. बांबूच्या उपयोगीतेची विविधता व व्यापकता असल्यामुळे आर्थिक सबळीकरण करण्याची क्षमता बांबूमध्ये असल्याने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने अटल बांबू समृद्धी योजना सुरू केली. याबाबत महसूल व वनविभागाने शासन निर्णय २८ जून २०१९ ला काढले आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बांबू रोपे मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरता येते. तसेच वनपरिक्षेत्राधिकारी (प्रादेशिक) यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करता येईल. राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत सदर बांबू लावगड ठिकाणी शेतकऱ्यांनी भेट देऊन बांबू रोपांची लागवड करावी, असे आवाहन नितीन कवाडकर यांनी केले. बांबूच्या टिशू कल्चर रोपांची शेतजमिनीवर लागवड केल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होईल. तसेच स्थानिक कारागिरांना देखील कच्चा माल मिळू शकते. रोपांची पाहणी करताना सहायक वनसंरक्षक सोनल भडके, वनपाल आरती कुंभारे, वनरक्षक शीतल कुळसंगे हजर होते.एक हेक्टर जागेवर बांबू रोपांचे व्यवस्थापनगडचिरोली वनविभागातील पोटेगाव मार्गावरील मध्यवर्ती रोपवाटिकेत राष्ट्रीय बांबू मिशन योजनेअंतर्गत १ हेक्टर क्षेत्रात विविध प्रजातींच्या बांबू रोपांची लागवड करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत प्रात्यक्षिकाकरिता ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी मिश्र बांबू (बालकुवा) चे ४०८ रोपे, बांबूसा टफलडज्ञ व कटांग बांबूच्या ६४२ रोपांची लागवड केली आहे. सदर लागवड ४ बाय ३ मीटर अंतरावर असून शास्त्रयुक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 6:00 AM
देशातील बहुतांश ठिकाणी बांबू ही जंगलातील नैसर्गिक वनस्पती आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीमधून व परसबागेत बांबूची लागवड केली जाते. जिल्ह्यातही बांबूपासून वस्तू निर्मिती करणारा मोठा जनसमुदाय आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक भूभाग जंगलांनी व्याप्त आहे. बांबूची मोठ्या प्रमाणात व सहज उपलब्धता आहे. त्यादृष्टीने बांबूचे व्यवसायिक प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे.
ठळक मुद्देनितीन कावडकर यांचे प्रतिपादन : मध्यवर्ती रोपवाटिकेत विविध प्रजातींच्या रोपांची लागवड